घरमुंबईसहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर महापालिका सेवेतून निवृत्त

सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर महापालिका सेवेतून निवृत्त

Subscribe

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर महापालिकेतील २१ वर्षांच्या सेवेनंतर ३१ मार्चला सेवानिवृत्त झाले. महापालिकेचे सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर हे सेवानिवृत्त होत असल्याने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी त्यांना पुप्षगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

क्षीरसागर यांनी जकात तसेच सुधार विभागांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावताना उद्यानांच्या विकासाकडेही विशेष लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे मुंबईतील उद्याने, मैदानांचा विकास वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळत आहे. क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन, विजय सिंघल यांच्यासह सह आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, विभागांचे प्रमुख तसेच खातेप्रमुख आदी उपस्थित होते. क्षीरसागर यांना महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महापालिका आपत्कालीन विभाग, महापालिका सुरक्षा विभाग तसेच उद्यान विभाग आदी विभागांच्या वतीने स्वतंत्र कार्यक्रम राबवून त्यांना शुभेच्छा दिल्या. क्षीरसागर यांनी परिमंडळ दोन उपायुक्त म्हणून सेवा बजावली. यावेळी त्यांनी महापालिका उत्सवांचे समन्वय म्हणून काम सांभाळताना मंडळांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करतच महापालिकेच्या वतीने उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वच स्तरातून झाले होते.

- Advertisement -

प्रशासकीय अधिकारी हेमांगी मालेगावकर सेवानिवृत्त

मुंबई महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी हेमांगी सुभाष मालेगावकर या ३२ वर्षांच्या सेवेनंतर महापालिकेतून सेवा निवृत्त झाल्या. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचे कामकाज सांभाळताना समिती व प्रशासनातील अधिकार्‍यांमधील दुवा म्हणून त्या कामगिरी बजावत होत्या. हेमांगी मालेगावकर या १९८६मध्ये महापालिकेत टंकलेखिका म्हणून रुजू झाल्या. प्रारंभी विधी विभागात काम केल्यानंतर त्यांची बदली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात झाली. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून बढती मिळाली. प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थायी समितीचे कामकाज अनेक वर्षे सांभाळलेे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -