घरमुंबई'सभे'चे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल

‘सभे’चे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात 'वंचित बहुजन आघाडी'च्या जाहीरसभेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या इसमांविरुद्धात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे सावट असताना मुंबई पोलिसांकडून पराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल एअर मिसाईलस् मायक्रोलाईट एयर क्राफ्ट, ड्रोन इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी धुडकावून शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या जाहीर सभेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘वंचित बहुजन आघाडी’च्या जाहीरसभेचे ड्रोनद्वारे चित्रीकरण

मुंबईत एकीकडे निवडणुकीचे वारे सुरू असून दुसरीकडे दहशतवादीचे सावट पसरले आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांनी मुंबईत १९ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या दरम्याम मुंबईत पराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल एअर मिसाईलस् मायक्रोलाईट एयर क्राफ्ट, ड्रोन इत्यादींवर बंदी आणलेली आहे. मुंबईत पोलिसांकडून नागरिकांना याबाबतची सुचना प्रत्येकी पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेली आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात ‘वंचित बहुजन आघाडी’ शनिवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन कऱण्यात आले होते. ही सभा सुरु असताना सभेसाठी आलेल्या कर्यकर्त्यापैकी एकाने स्वतःच्या ताब्यातील ड्रोन कॅमेराने विनापरवाना या सभेचे चित्रीकरण केले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

विनापरवाना ड्रोन कॅमेराने केले चित्रीकरण

पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना ड्रोन कॅमेराने चित्रीकरण केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरुद्ध कलम १८८ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत गायकवाड यांच्याकडे संपर्क साधला असता असला कुठलाही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले आहे. मात्र पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलण्याची साधी तसदी देखील घेतली नाही.


हेही वाचा – कच्छ सीमेवर पाकिस्तान ड्रोन, लष्कराने तात्काळ केली कारवाई

- Advertisement -

हेही वाचा – सुरत-हैदराबाद हायवेसाठी ‘ड्रोन’व्दारे सर्वेक्षण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -