घरताज्या घडामोडीCyclone Tauktae: कोकणासह मुंबईतील काही भागात पावसाची हजेरी

Cyclone Tauktae: कोकणासह मुंबईतील काही भागात पावसाची हजेरी

Subscribe

पुढील दोन दिवसात कोकण आणि मुंबईसह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात आलेले तोक्ते चक्रिवादळ (Cyclone Tauktae) १६ मेला सिंधुदर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणासह मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. (Presence of rain in some parts of Mumbai including Konkan) अरबी समुद्रात दाखल झालेल्या या तोक्ते चक्रिवादळामुळे कोकणासह मुंबईलाही पुढील दोन दिवस हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. १६मेच्या पहाटे ४ वाजता तोक्ते वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले हे वादळ दुपारी २ वाजता जिल्ह्याच्या सीमा ओलांडणार असल्याचे सांगितले जात आहे. या काळात लोकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात कोकण आणि मुंबईसह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे,रायड,पालघरसह किनारपट्टीभागात प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात काळे ढग जमा झाल्याचे दिसून आले आहे. वाऱ्यासह पावसाने जोर धरला आहे. रात्री उशिरा पर्यंत जिल्ह्यातील तोक्ते वादळाचा प्रभाव कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

अरबी समुद्रात तयार झालेले तोक्ते चक्रिवादळाचा वेग तासाला अधिक सक्रीय होऊन त्याचा वेग वाढेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा – औषधांच्या पॅकिंगवरून लाल, हिरवे चिन्हे होणार गायब

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -