घरताज्या घडामोडीगिरगाव चौपाटीची शान वाढणार; ‘दर्शक गॅलरी’तून मरिन ड्राइव्हचे विहंगम दर्शन घडणार

गिरगाव चौपाटीची शान वाढणार; ‘दर्शक गॅलरी’तून मरिन ड्राइव्हचे विहंगम दर्शन घडणार

Subscribe

मुंबईतील माहिम चौपटी पाठोपाठ आता गिरगाव चौपाटीसुद्धा कात टाकणार आहे. गिरगाव चौपाटी येथील ‘स्वराज्यभूमी’ लगत येत्या ३ महिन्यात आकर्षक अशी ‘दर्शक गॅलरी’ उभारण्यात येणार आहे. या गॅलरीमधून राणीचा रत्नहार असलेल्या ‘मरिन ड्राइव्ह’ परिसराचे विहंगम दर्शन पर्यटकांना घडणार आहे. या गिरगाव चौपाटीच्या सुशोभीकरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील पर्यटन स्थळांच्या संख्येत आणखीन एका पर्यटन स्थळाची भर पडणार आहे.

गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राईव्हचे वैशिष्ट्यपूर्ण आणि मनमोहक दर्शन घडविणाऱ्या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

अशी असेल ‘दर्शक गॅलरी’

गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला आणि नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणाऱ्या पर्जन जलवाहिनीच्या वरती सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे तसेच ‘राणीचा रत्नहार’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय व मनमोहक दर्शन घडविणा-या गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यापूर्वी भरती – ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. तसेच, सदर गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – कृती दलाशी चर्चा करूनच शाळांचा निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -