घरमुंबईव्यापारी, गिरणी कामगारांनी भरले देवरांचे डिपॉझिट

व्यापारी, गिरणी कामगारांनी भरले देवरांचे डिपॉझिट

Subscribe

सरकारविरोधी नाराज घटकांचा घेतला पाठिंबा

काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात प्रवर्तक म्हणून कोणताही राजकीय नेता किंवा कुटुंबीयांचा पाठिंबा न घेता थेट गिरणी कामगार, जीएसटीने त्रस्त झालेले व्यापारी आणि बेरोजगार तरुण यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर देवरा यांच्या उमेदवारीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कमही गिरणी कामगारांचे कुटुंबीय आणि लघु उद्योजक यांनी हातभार लावत भरली. अशाप्रकारे सोमवारी देवरा यांचा अर्ज सादर करण्यात आला. यावेळी पुन्हा एकदा मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी जाहीर केलेल्या ५०० चौ.फूट घरांबाबत आपण ठाम असल्याचे दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केले.

या प्रसंगी गिरणी कामगारांचे नातेवाईक वैजंयती गावडे, बेरोजगार तरुण ऋषीकेष गुहागारकर आणि व्यापारी प्रतिनिधी म्हणून चंद्र चाडवा यांनी उपस्थित राहून देवरा यांच्या उमेदवारी अर्जावर प्रवर्तक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना देवरा म्हणाले की, गिरणी कामगार, बेस्ट कर्मचारी, मुंबईतील कोळी, व्यापारी वर्ग या सर्वांच्या खांद्यावर मुंबई चालत आहे. परंतु या सरकारने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत त्यांच्या पाठीत सुरा खुपसला असल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांत या सरकारचे या सर्व घटकांना जे दिले त्यांचे भयाण वास्तव सर्वांसमोर यानिमित्ताने आले असून त्यामुळे या सर्वांनी आपल्या अर्जावर प्रवर्तक म्हणून सही करण्यासाठी पुढे आले आहेत. हे सरकार आश्वासनापलीकडे काहीच देत नाही. आता ऐन निवडणुकीच्या मुद्यावर विकासाच्या मुद्यावर न बोलता हे सरकार आता भावनिक मुद्यांवर निवडणूक लढू पाहत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तर आज ‘स्वच्छ भारत’च्या नावावर मुंबईकरांकडून कर वसूल केला जातो. मात्र, मुंबईत किती स्वच्छता आहे, हे आपल्या सर्वांना ठाऊक असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -