घरताज्या घडामोडी‘...तर तुमचे अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असते’ : देवेंद्र फडणवीस

‘…तर तुमचे अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असते’ : देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे स्वप्न दाखवून सरकारने त्यांच्याकडे पाठ दाखवली. राज्यात मोठी दलाली सुरू आहे. आयटीच्या रेडमध्ये लक्षात आले आहे की काही मंत्र्यांनी वसुलीचे सॅाफ्टवेअर तयार केले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ईडी, सीबीआय याचे भय कुणाला असेल? ज्याने काही केले असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत. ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करू देत नाहीत. एजन्सीच्या कामाआड ते येत नाहीत आणि वापरही करत नाहीत. अन्यथा एजन्सीचा वापर केला असता तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये असते. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत असा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

गेल्या काळात काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेतेही करणार नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाहीत. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचे आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर

देवेंद्र फडणवीस यांनी आयटी विभागाच्या छापेमारीत वसुलीचे सॉफ्टवेअर आढळून आले असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नको. राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे… खरे म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे असे आयटीच्या छापेमारीत लक्षात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच.
आपण मुख्यमंत्रीपदी असल्याचे ठाकरे विसरले. जनतेने भाजपला नाकारले नाही. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले. जनतेशी बेईमानी करून तुम्ही सत्तेत आलात. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आहेत. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती, मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली, मग आम्हाला दोष का, अशी विचारणा त्यांनी केली.

- Advertisement -

एकूणच कालच्या मेळाव्यात ना विचार होतं, ना सोनं होतं. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचे फ्रस्ट्रेशन होईल आणि अशाच प्रकारचे वक्तव्य निघेल. मी केवळ इतकेच सांगतो भाजपला नामोहरण करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही सत्ता वापरली, पैसा वापरला तरी देखील नंबर एकचा पक्ष भाजपच होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -