घरमुंबईदिलीप कुमार यांनी केला २०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

दिलीप कुमार यांनी केला २०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Subscribe

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानू यांनी वांद्रे येथील जागेच्या वादावरुन बिल्डर विरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. बिल्डर भोजवानी विरोधात २०० कोटींचा दावा करण्यात आला.

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानू यांनी वांद्रे परिसरातील २५० कोटींच्या संपत्तीबाबत चुकीचा दावा केल्यामुळे बिल्डर समीर भोजवानी विरोधात अभ्रू नुकसानीचा दावा केला आहे. या संदर्भात बिल्डर भोजवानीला नोटीस पाठवण्यात आली आहे. ही संपत्ती आपली असल्याचा दावा बिल्डर भोजवानीने केला होता. मात्र भोजवानी याने आपली बदनामी केला असल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या दाम्पत्याने जानेवारी २०१८ मध्ये बिल्डर भोजवानी विरोधात तक्रार दाखल केली होती. वांद्रे येथील पाली हिल परिसरातील एका जागेवर भोजवानीने आपला मालकी हक्क असल्याचे सांगितले होते. मात्र ही मालमत्ता भोजवनीची नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. यानंतर आता या दाम्पत्याने अब्रुनुकसानीचा दावा केला.

दिलीप कुमार भाडेकरू असल्याचा दावा

भोजवानीने २१ डिसेंबर २०१८ रोजी एक सार्वजनीक नोटीस काढून वांद्रे येथील संपत्तीवर आपला दावा केला होता. दिलीप कुमार आणि सायरा बानू हे या जागेवर भाडोत्री असल्याचे बिल्डरने सांगितले होते. यामुळे या दाम्पत्याने ३१ डिसेंबर रोजी भोजवानी यांच्या अब्रुनुकसानीचा दावा केला होता. यावरुन भोजवानीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली होती. मागील अनेक महिन्यांपासून बिल्डर आणि दाम्पत्यामध्ये वाद सुरु आहे. या वादामुळे या दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दाम्पत्याला मदतीचे आश्वासन दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -