घरमुंबईनालासोपार्‍यात दोन गटात राडा

नालासोपार्‍यात दोन गटात राडा

Subscribe

नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दहा जण जखमी झाले आहेत. तर राड्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या दहाहून अधिक मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

शिवसेनेचे मागील महापालिकेचा उमेदवार संजय बिहारी यांच्या ऑफ़िसवर त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाने सशस्त्र हल्ला केला. यावेळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात दहा जण जखमी झाले असून संजय बिहारी आणि प्रमोद यादव या दोघांना जबर मारहाण करण्यात आली आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून यातील प्रमोद यादव गंभीर जखमी आहे. हल्लेखोरांनी या परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या दहाहून अधिक मोटारसायकलींचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -