घरमुंबईकल्याणमध्ये सांडपाणी आले रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कल्याणमध्ये सांडपाणी आले रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Subscribe

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गटारे तुंबली असून गटाराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी पालिकेच्या नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाल्याचा दिसून आला आहे. एकिकडे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते तर दुसरीकडे  गटारांचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. गटाराच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.

गटाराचे पाणी रस्त्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात

गेल्या आठवडारापासून  पडणाऱ्या पावसाने कल्याण डोंबिवलीला चांगलच धुतले आहे. शनिवारी सकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण शहरातील शिवाजी महाराज चौक, मोहम्मद अली चौक या प्रमुख ठिकाणांसह विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच गटारांची साफसफाई झालेली नसल्याने गटारांचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरले होते. या पाण्यातूनच विद्यार्थी आणि नागरिकांना जावे लागले. गटारांच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भितीही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच डोंबिवली नांदिवली रोड समर्थनगर येथे पाणी साचल्याने त्या पाण्यातूनच वाहने आणि नागरिकांना वाट काढावी लागत होती. त्यामुळे नालेसफाईची कामे व्यवस्थितपणे झाली नसल्याचे यातून दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या कामांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे साडेतीन कोटयावधी रूपयांचे खासगी कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराकडून नाल्यांची सफाई केली जात नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनीही नालेसफाईची कामे झाली नसल्याचे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आता पावसामुळे नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. सत्ताधारी पक्षातील एका पदाधिऱ्याचे हितसंबध कंत्राटात गुंतलेले आहे. त्यामुळेच नालेसफाईची कामे होऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

- Advertisement -

मरेची रखडपट्टी कायमच

सोमवारपासून मध्य रेल्वेची सेवा रडतखडत सुरू असतानाच शनिवारीही प्रवाशांना रखडपट्टीला सामोरे जावे लागले. पावसामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता. मुंबईकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल सेवा तब्बल ३५ ते ४० मिनीटे उशिराने धावत होती. त्यामुळे कल्याण ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांना डब्यात चढणेही मुश्किल होऊन बसले होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चाकरमान्यांचे हाल झाल्याने दिसून आले आहे.


हेही वाचा – मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; गटारे तुडुंब भरली

- Advertisement -

हेही वाचा –  मुंबईला झोडपल्यानंतर सोशल मीडियावरही ‘मेम्स’चा पाऊस!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -