घरमुंबईपालिकेचे इलेक्ट्रिक वाहन धोरण ६ महिन्यात, नवीन इमारतीत पार्किंग चार्जिंग स्टेशन बंधनकारक 

पालिकेचे इलेक्ट्रिक वाहन धोरण ६ महिन्यात, नवीन इमारतीत पार्किंग चार्जिंग स्टेशन बंधनकारक 

Subscribe

मुंबईत सध्या ५ हजार ६६ इलेक्ट्रिक वाहने आहेत. २०१९ मध्ये ६४२ इलेक्ट्रिक वाहनांची, २०२० मध्ये १ हजार ४२२ वाहनांची तर २०२१ मध्ये ३ हजार २ वाहनांची नोंद झाली आहे.

मुंबई महापालिका प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण आगामी सहा महिन्यात तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहे.सदर धोरणासाठी डिसीआरमध्ये करणार तरतूद नगरविकास खात्याला पालिकेतर्फे विनंती करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत यापुढे नवीन इमारतींमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन व इलेक्ट्रिक वाहनांसाठी २० टक्के पार्किंग बंधनकारक करणार आहे. मात्र त्या बदल्यात बिल्डरला पालिकेला देय असलेल्या करात काही प्रमाणात सवलत देण्याचा पालिकेचा विचार आहे.

यासंदर्भातील माहिती पर्यावरण खात्याचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसह राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण अंमलात आणणार आहे. शासनाने या संदर्भात धोरण तयार केले असून त्याबाबत अद्याप परिपत्रक काढण्यात आलेले नाही. मुंबई महापालिका सदर धोरण तयार करत असून आगामी ६ महिन्यात सदर धोरण पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्यासाठी सर्वसंबंधितांची एक बैठक गेल्याच आठवड्यात घेण्यात आली. त्यामध्ये सदर धोरण लवकरात लवकर बनविण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली, असे सुनील गोडसे यांनी सांगितले.
मुंबईत वाढत्या शहरीकरणाबरोबरच वाहनांच्या संख्येतही खूप मोठी वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण पूरक वाहन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग धोरण बनवले आहे. मात्र त्याबाबतचा अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने मुंबईत इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण अंमलात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. एप्रिल २०२२ नंतर शासन व पालिका प्रशासन येथे फक्त इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करण्यात येणार असून त्या गाड्यांचाच वापर करण्यात येणार आहे.

मुंबईत सध्या ५ हजार ६६ इलेक्ट्रिक वाहने आहेत. २०१९ मध्ये ६४२ इलेक्ट्रिक वाहनांची, २०२० मध्ये १ हजार ४२२ वाहनांची तर २०२१ मध्ये ३ हजार २ वाहनांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका मुंबईसाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग धोरण येत्या ६ महिन्यांत तयार करणार आहे. मात्र हे धोरण बनविण्यासाठी डिसीआरमध्ये तरतूद करण्याबाबत पालिका नगरविकास खात्याला पत्राद्वारे विनंती करणार असून या धोरणाच्या अंतर्गत मुंबईत नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदी, नवीन इमारतीत, कमर्शियल इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी २० टक्के पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक करणार आहे. त्या बदल्यात बिल्डरला पालिकेला देय असलेल्या करात काही प्रमाणात सवलत देण्याचा पालिकेचा विचार आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमात आगामी काळात पेट्रोल, डिझेलवरील सर्वच बसगाड्या भंगारात मोडीत काढून आगामी काळात तब्बल १० हजार इलेक्ट्रिक बस गाड्यांचा ताफा निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. सध्या बेस्टच्या बस ताफ्यात ३८६ इलेक्ट्रिक बस गाड्या आहेत.२०२३ पर्यन्त ३ हजार इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा निर्माण करण्यात येणार असल्याचे सुनील गोडसे यांनी सांगितले.

सध्या मुंबईत ६ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन आहेत. आगामी काळात १ हजार ५०० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचा पालिकेचा संकल्प असल्याचे त्यांनी माहिती देताना सांगितले. एका इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी किमान ६ ते १२ व्हेईकल चार्ज करता येतात, असे सुनील गोडसे यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये सध्या आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने या वाहनांच्या भक्कम सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाच्या मार्गदर्शनाखाली काही कडक नियम करण्यात येणार असून त्यांचा इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणात समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -