घरमुंबईपाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये आपत्कालिन प्रशिक्षणाचे धडे

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये आपत्कालिन प्रशिक्षणाचे धडे

Subscribe

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आपत्कालिन प्रशिक्षणाचे धडे शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये सक्तीचे देण्यात यावे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आपत्कालिन प्रशिक्षणाचे धडे शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये सक्तीचे देण्यात यावे. तसेच वर्षांतून दोन वेळा महापालिका शाळांमध्ये आपत्कालिन परिस्थितीसंदर्भात मॉकड्रिल करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई महापालकेच्या शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळांमधील अग्निशमन यंत्रणा तसेच व्यवस्था यांचे फायर ऑडीट करण्यात यावे आणि शाळेतील सर्व कर्मचार्‍यांना आपत्कालिन व्यवस्थापनेचे प्रशिक्षण देण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केली होती. याबाबत प्रशासनाच्या अभिप्रायाचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आल्यानंतर म्हात्रे यांनी याला तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेसह किती शाळांची फायर ऑडीट पूर्ण झाले याची माहिती प्रशासनाने दिलीच नसल्याचे सांगत फायर ऑडीट झालेल्या शाळांची यादी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तर भाजपचे पंकज यादव यांनी महापालिका शाळांसह इतर शाळांसाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. परंंतु हा आराखडा कागदावरच असल्याचे सांगत या आराखड्याची अंमलबजावणी किती शाळांमध्ये केली जाते, अशी विचारणा केली. तसेच महापालिकेसह सर्व शाळांमध्ये वर्षातून दोनवेळा मॉकड्रिल करण्यात यावे. हे मॉकड्रिल शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात हे मॉकड्रिल केले जावे, अशी सूचना केली.

- Advertisement -

शिवसेनेचे साईनाथ दुर्गे यांनीही फायर ऑडीट किती शाळांचे केले याची माहिती प्रशासनाने देण्याची मागणी केली. तर काँग्रेसच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे दिले जावे, अशी मागणी केली. यासाठी शारीरिक शिक्षणाचा एक तास राखीव ठेवून त्या तासांमध्ये हे प्रशिक्षण दिले जावे, अशी सूचना केली. सदस्यांच्या सूचनांची दखल घेत शिक्षण विभाागाचे सहआयुक्त आशुतोष सलील यांनी सर्व मुद्दयांची लेखी उत्तर पुढील बैठकीत दिली जातील, असे उत्तर दिले. त्यामुळे हा प्रस्ताव समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दप्तरी दाखल केला.

हेही वाचा –

नाशिककरांसाठी दुर्मिळ शस्त्रे, नाण्यांचा खजिना खुला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -