गुढीपाडवा सभेच्या काही तास आधी मनसेकडून स्फूर्तीगीत सादर

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आज मनसेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. या पाडवा मेळाव्याची मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पण या सभेच्या काही तास आधीच मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पक्षाचं नवं स्फुर्तीगीत सादर करण्यात आले आहे.

few hours before the Gudipadwa meeting, a rousing song was performed by the MNS

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. पडावा मेळावा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेमधून राज ठाकरे यांची तोफ कोणावर धडाडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. पण या सभेच्या आधी मनसेकडून त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरून स्फुर्तीगीत सादर करण्यात आले आहे.

या स्फुर्तीगीतामध्ये “करू तयारी रे… घेऊ भरारी रे.. राजमुद्राही मिरवूया..” असे बोल शब्दबद्ध करण्यात आले आहेत. तसेच गुढी उभारू नवनिर्माणाची.. मनामनात निनादणार मनसे स्फुर्तीगीत असेही या व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे. त्यामुळे मनसेचे हे नवे स्फुर्तीगीत आज या पाडवा मेळाव्यामध्ये सर्वत्र ऐकू येणार आहे.

याआधी, मनसेकडून गुढीपाडवा मेळावा यासाठीचे तीन ट्रेलर सादर करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मनसेचा पाडवा मेळावा दणक्यात होणार असल्याचे दिसून येत आहे. मनसेने याआधी वेगवेगळ्या आशयाचे तीन ट्रेलर त्यांच्या सोशल मिडीयाला शेअर केले आहेत.

दरम्यान, मनसेच्या या पाडवा मेळाव्यासाठी राज्यभरातील मनसैनिक सभेसाठी दाखल होऊ लागले आहेत. तसेच, यंदाच्या वर्षी राज ठाकरे या सभेच्या माध्यमातून कोणावर निशाणा साधणार आणि नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये अभूतपूर्व सभा घेतली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच गोळीबार मैदानातून ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. कोणाची सभा तुफान गाजली यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता राज ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होणार यावर चर्चा रंगू लागली आहे. याबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे अणुबॉम्ब असणार आहे आणि त्याचे हादरे सगळ्यांनाच बसणार आहेत. राज ठाकरेंची सभा ही नेहमीच रेकॉर्ड ब्रेक असते. त्यांच्या आधीच्या सभांचा रेकॉर्ड हे फक्त तेच मोडू शकतात. बाकी कुणालाही त्यांच्या सभेचा रेकॉर्ड मोडणं शक्य नाही.”


हेही वाचा – राज ठाकरे आज कोणत्या मुद्द्यावर बोलणार? संदीप देशपांडे म्हणाले, अतिशय खालच्या दर्जाचं…