घरमुंबईमुंबईत पुन्हा आग, १ ठार, १९ जखमी

मुंबईत पुन्हा आग, १ ठार, १९ जखमी

Subscribe

मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

दक्षिण मुंबईत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाली आहेत. महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावर असणाऱ्या सम्राट अशोका इमारतीत हा प्रकार घडला असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील इमारतींमध्ये अग्निसुरक्षा पाळली जाते की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

वाचा- कल्याणमध्ये चायनिज हॉटेलला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

कधी लागली आग?

आगीची ही घटना शनिवारी रात्री २ वाजता घडली. १८मजल्याच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली आणि पळापळ झाली. तिसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रीसिटी बॉक्समध्ये ही आग लागली आणि आग हळूहळू शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीतील वरच्या मजल्यावरील स्थानिकांना सगळ्यात आधी बाहेर काढले. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. या धुरामुळे अनेक जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यातील ७० वर्षीय लक्ष्मीबाई कोळी यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -
 हे ही वाचा- भिवंडीमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग

असे झाले रेस्क्यू ऑपरेशन

सम्राट अशोका इमारतीतील आगीचा कॉल अग्निशमन दलाला आल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेतली. उंच इमारतीमुळे आगीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी शिडी देखील मागवण्यात आली. इमारतीतील ५० हून अधिक जणांना इमारतींच्या पायऱ्यावरुन खाली उतरवण्यात आले. तर काहींसाठी शिडीचा वापर देखील करण्यात आला, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.

वाचा-वांद्रे येथील शास्त्री नगर झोपडपट्टीला आग

सुरक्षेचे तीन तेरा

मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक इमारती या नियमांचे उल्लंघन करतात हे निदर्शनास आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -