घरमुंबईइस्माईल युसुफ कॉलेजमध्ये फायरिंग रेंज

इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये फायरिंग रेंज

Subscribe

१६ विकास कामांसाठी ११ कोटी खर्च

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शुटींग तसेच शुटींग खेळात करियर करणार्‍या विद्यार्थ्यांना सराव करता यावा या उद्देशाने इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये फायरिंग रेंज उभारण्यात येणार आहे. फायरिंग रेजबरोबरच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑबस्टॅकल ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक प्रयोगशाळा, उर्दू ग्रंथालयाचे नुतनीकरण अशी तब्बल 16 कामे करण्यात येणार आहे. यासाठी 10 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.

इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये जिल्हा वार्षिक योजना व उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या निधीतून केलेल्या विकास कामांमुळे कॉलेजला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळण्यास मदत झाली. त्यामुळे कॉलेजमधील सोईसुविधा अद्ययावत करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यावर कॉलेजमध्ये भर देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉलेजमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना फायरिंगचा सराव करता यावा तसेच शुटींग क्रीडा प्रकारात करियर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कॉलेजमध्ये फायरिंग रेज बनवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे व ऑबस्टॅकल ट्रॅक, विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी रुम, इलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळेच नुतनीकरण, वसतिगृहाचे नुतनीकरण, अधीक्षक निवासस्थानाचे नुतनीकरण, उर्दु ग्रंथालयाचे नुतनीकरण, स्टॅक रुम व जिमखाना विभाग अद्ययावत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विकास कामांमुळे इस्माईल युसूफ कॉलेजचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ही विकासकामांसाठी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी 11 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून, या कामाचे बुधवारी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष-२०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभही वायकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -