घरमुंबईतिहेरी तलाक विधेयकाच्या मंजुरीनंतर मुंब्रयात पहिलाच गुन्हा दाखल

तिहेरी तलाक विधेयकाच्या मंजुरीनंतर मुंब्रयात पहिलाच गुन्हा दाखल

Subscribe

तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात प्रथमच मुंब्रा येथे पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात प्रथमच मुंब्रा येथे पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. एका मुस्लिम महिलेला तिच्या पतीने मोबाईलवर ‘तलाक तलाक तलाक’ असा मेसेज पाठवला हेाता. ती महिला सात महिन्याची गरोदार आहे. त्यामुळे तिने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात इम्तीयाज गुलाम हुसेन पटेल (पती), रिहाना गुलाम हुसेन पटेल (सासू) सुलतान गुलाम हुसेन पेटेल (नणंद) या तिघांविरोधात मुस्लीम महिला (विवाहवरील हक्काचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

हेही वाचा – ‘पत्नीवर गोळ्या झाडण्यापेक्षा तिहेरी तलाक देणे चांगले’

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

मुंब्रा येथील कौसा परिसरात राहाणारी जन्नत बेगम इम्तीयाज पटेल या महिलेला माहेरून पैसे आणि दागिने घेऊन येण्यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला जात होता. तसेच पती इम्तीयाजने मोटार सायकल घेण्यासाठी सासऱ्याकडून पैसे घेतले आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशाची मागणी करून तिला मारहाण करीत असे. तसेच इम्तियाजने मोबाईलच्या व्हॉटसअॅपवरून ‘तलाक तलाक तलाक’ असे बोलून बेकायदेशीपणे तलाक दिला, असे जन्नतने पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात तिचा पती, सासू आणि नणंद या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाय. आर. पाटील अधिक तपास करीत आहेत. तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा – ऐतिहासिक! तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

- Advertisement -

राज्यसभेत मंजूर झाले विधेयक

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे. मंगळवारी तिहेरी विधेयकावर राज्यसभेत वादळी चर्चा झाली होती. या विधेयकामुळे मुस्लिम महिलांना संरक्षण मिळाले आहे. या विधेयकानुसार तिहेरी तलाक तलाक ए बिद्दतला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. या विधेयकामुळे तोंडी तलाक देणे गुन्हा असून, कोणत्याही वारंटशिवाय आरोपीला अटक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आरोपीची रवानगी ३ वर्षासाठी थेट तुरूंगात होणार आहे. तसेच पिडीत महिलेची बाजू घेतल्याशिवाय तलाक देणा- यास जामीन न देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.


हेही वाचा – तिहेरी तलाकविरोधी कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -