घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाप्रभाकर येऊल यांचा इको फ्रेंडली बाप्पा

प्रभाकर येऊल यांचा इको फ्रेंडली बाप्पा

Subscribe

प्रभाकर ऊध्दराव येऊल मंगलमय ईकोफ्रेंडली गणपती मुर्ती आणि सजावट केलेली आहे. भांडुपमधील सर्वादय नगर येथे गेली १५ वर्ष ते इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. येऊल यांच्या घरी पाच दिवसाचा गणपती बसतो. यावर्षी त्यांनी गणरायाची कागदाची मुर्ती आणली आहे. सजावटीसाठी पुठ्ठा आणि प्लायवूड वापरले आहे.
निसर्गाची हानी होऊ नये, पर्यावरणाचे रक्षण व्हावे या भूमिकेतूनच १५ वर्षांपासून प्रभाकर येऊल इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. संपुर्ण कुटुंबीय या सजावटीसाठी निरनिराळ्या कल्पना राबवत असतो. यावेळी त्यांनी सुंदर अशा मोरपिसांची सजावट केलेली आहे. अगदी खराखरा मोर वाटावा इतका देखणा देखावा येऊल यांनी तयार केलेला आहे.
तुम्हाला प्रभाकर येऊल यांची संकल्पना आवडली असल्यास त्यांना वोट नक्की करा..
चला तर आपण सर्व मिळून पर्यावरणपूरक उत्सवाचा संदशे समाजाला देऊया.

3 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -