घरमुंबईपितृपक्ष आहे..., म्हणून धनुष्य बाण शिवसेनाच जिंकेल - किशोरी पेडणेकर

पितृपक्ष आहे…, म्हणून धनुष्य बाण शिवसेनाच जिंकेल – किशोरी पेडणेकर

Subscribe

मुंबई – माजी महपौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेच्या चिन्हाच्या गोठवायच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचा हवाला दिला. त्या म्हणाल्या पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे, या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली असतील. त्यामुळे धनुष्य बाण निवडणूक चिन्ह आम्हीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काँग्रेसचे गाय वासरु नका विसरु, काँग्रेसचा हात सबका विकास सबका साथ असे म्हणत काँग्रेसच्या गोठवलेल्या चिन्हाचा हवाला दिला.

शिंदे गटाचे मनसुबे दिसायला लागलेत –

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मनसुबे, त्यांची दात-नखे खऱ्या अर्थाने दिसायला लागली आहेत. समोरच्याला चारी मुंड्या चित करायचे, पण लोकशाही पद्धतीने नाही, चिन्हं स्वतःकडे घ्यायचे किंवा गोठवायचे हा त्यांचा इरादा आहे. पण आमच्याकडे चिन्हावर लढवूनही अनेक जण हरलेत. चिन्ह महत्त्वाचेच आहे, माझा न्यायदेवता आणि संविधानावर विश्वास आहे, कोर्ट जो निर्णय देईल, त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कॅडर सामोरा जाईल, असे किशोरी पेडणेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

काँग्रेसचे दिला हवाला  –

- Advertisement -

धनुष्य बाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आमच्याकडेच राहील. गाय वासरु नका विसरु हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह होते. ते गोठल्यानंतर हात – सबका विकास सबका साथ निवडणूक चिन्ह मिळाले. त्यानंतर झालेली पहिली निवडणूक काँग्रेस जिंकली होती. त्यामुळे आमचाही विजय होईल अशी खात्री आहे. मात्र, समजा नाहीच मिळाले धनुष्यबाण, तरी सुद्धा जे चिन्हे मिळेल ते चिन्ह घराघरात पोहोचवून आम्ही जिंकू, हा विश्वास शिवसैनिक, मतदार आणि शिवसेना पक्षप्रमुखांना आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

शिवसेना पितृपक्ष –

पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे, शिवसेना हा खऱ्या अर्थाने पितृपक्ष आहे, पितृपक्षात सगळी पितरं खाली येतात, बाळासाहेबही नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू, असा विश्वास पेडणेकरांनी व्यक्त केला.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -