मुंबईच्या कांदिवली परिसरात आढळले चार मृतदेह

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळल्याची घटना मुंबईच्या कांदिवली परिसरात घडली आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत.

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळल्याची घटना मुंबईच्या कांदिवली परिसरात घडली आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी हे मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. (four dead body founds in kandiwali mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, या मृतांच्या ठिकाणीच एक सुसाईड नोट सापडली आहे. भूमी दळवी नामक महिलेच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतल्याचा उल्लेख ड्रायव्हर शिव दयाल याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

कांदिवलीतील देना बँक जंक्शन येथे एक माणूस हातात विळा घेऊन फिरत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना नियंत्रण कक्षावर मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल व्हॅनसह रात्र पाळीवर असलेले पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी परिसराची झडती घेतली. शिवाय उपस्थित स्थानिकांशी विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी एका व्यक्तीला २ महिलांसह दळवी हॉस्पिटलच्या इमारतीत जाताना पाहिले आणि त्यांना त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला.

डिटेक्शन कर्मचारी आणि मोबाईल कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसराची झडती घेतली असता रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर दोन महिलांचे मृतदेह सापडले. पहिल्या मजल्यावरही शोध घेतला असता तेथे दोन व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळल्या अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस अधीक तपास करत आहेत.


हेही वाचा – आता आपले मार्ग वेगळे, संजय राऊतांनी बंडखोर शिंदे गटाला स्पष्टच सांगितलं