घरमुंबईमानखुर्द येथे महिलेवर सामूहिक बलात्कार

मानखुर्द येथे महिलेवर सामूहिक बलात्कार

Subscribe

मानखुर्द येथे एका महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांंनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मानखुर्द येथे एका विधवा महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. महिलेने प्रतिकार करण्याच भरपूर प्रयत्न केला. परंतु, नराधमांनी तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. चौघांनी निघृणपणे तिच्यावर बलात्कार करुन तिला रस्त्यावर सोडून पळ काढला. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा – मुंबईत गतिमंद तरूणीवर बलात्कार, आरोपी ताब्यात

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

गुरुवारी रात्री विधवा महिला घरी जात असताना मानखुर्द मंडाला येथील साठे नगर परिसरातील सर्व्हिस रोडवर चार नराधमांनी अडवले. या रस्त्यावर जास्त रात्रीच्या वेळी जास्त वर्दळ नसते. त्यामुळे नराधमांनी महिलेला अडवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने विरोध केला असता तिला मारहाण देखील केली आणि बलात्कार करुन रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर चारही नराधम फरार झाले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा – बलात्कार करणाऱ्यांना क्लिन चीट; पीडितेची आत्महत्या

- Advertisement -

वारंवार घडताहेत महिला अत्याचारांच्या घटना

मुंबईमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे. रात्रीच्यावेळी रेल्वेमध्ये महिलेकडे बघून अश्लील चाळे करणाऱ्या बऱ्याच घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुर्ला येथे एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटना वारंवार घडत आहेत.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -