घरमुंबईगणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी

गणेशभक्तांच्या उत्साहावर पाणी

Subscribe

मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेलेल्या वरुणराजाने गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. मुंबई, उपनगर, नवी मुंबई, वसईसह कोकणातील अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली आहे. संततधार पावसामुळे दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनाला फटका बसला. त्यामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली. त्यामुळे मंगळवारी अनेक गणेशभक्तांनी अत्यंत साधेपणाने आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. मुख्य म्हणजे, यामुळे मुंबईतील बहुतांश विसर्जनाच्या ठिकाणी नेहमीप्रमाणे गणेशभक्तांची गर्दी झाली नाही. वाजंत्रीच्या तालावर काढण्यात येणार्‍या मिरवणुका थंडावल्या.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आणि वसईत सोमवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर झालेल्या या पुनरागमनामुळे उकाड्याने हैराण झालेला मुंबईकर सुखावला. सोमवारी रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून मात्र जोर वाढविला. त्यामुळे दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जोरदार तयारी केलेल्या अनेक भक्तांची तारांबळ उडाली. ऐन पावसातच त्यांना आपल्या बाप्पाला निरोप द्यावा लागला. दरम्यान, मुंबईत कुलाबा येथे सकाळी ८.३० ते सांयकाळी ५.३० पर्यंत ४५.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सांताक्रूझ येथे याच वेळेत पावसाची नोंद २९.८ मिमी इतकी नोंदविण्यात आली. तर सोमवारी सकाळी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 या 24 तासांमध्ये सांताक्रूझ येथे 131.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, या पावसाबद्दल हवामान खात्याकडे विचारणा केली असता यंदाचा पाऊस 3000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर 1 जूनपासून 3 सप्टेंबरपर्यंत सांताक्रूझ येथे 2717.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 3 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत मुंबई शहरात 41 टक्के पाऊस अतिरिक्त नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईप्रमाणे कोकणात रायगड, रत्नागिरी आणि इतर ठिकाणीही पाऊस पडल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना पावसाचा सामना करावा लागला. तर मंगळवारपेक्षा बुधवारी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गौरी आगमन, विसर्जन आणि पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा आहे.

विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा दमदार हजेरी

मुंबई, उपनगर,रायगड नवी मुंबई, पालघरसह कोकणाला झोडपले!

- Advertisement -

मुंबईप्रमाणे कोकणात रायगड, रत्नागिरी आणि इतर ठिकाणीही पाऊस पडल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना पावसाचा सामना करावा लागला. तर मंगळवारपेक्षा बुधवारी पावसाचा जोर वाढेल, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता आहे. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -