घरताज्या घडामोडीरुग्णालयातील बेड फुल; नव्या आयुक्तांपुढे पेच

रुग्णालयातील बेड फुल; नव्या आयुक्तांपुढे पेच

Subscribe

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असून शहरातील रुग्णांचे वाढते प्रमाण आणि सरकारी रुग्णालयाचे भरलेले बेड हे येत्या काळात उल्हासनगर वासियांसाठी धोक्याची घंटा आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील रुग्णांचे वाढते प्रमाण आणि सरकारी रुग्णालयाचे भरलेले बेड हे येत्या काळात उल्हासनगर वासियांसाठी धोक्याची घंटा आहे. मात्र, या परिस्थितीला शिक्षणाने डॉक्टर असलेले नवे आयुक्त कसे सामोरे जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५०० च्या घरात गेली आहे. त्यापैकी ७०० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत, असे असतानाच कॅम्प ४ मधले कोविड रुग्णालय, कामगार रुग्णालय हे फुल झाले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि आयटीआय सेंटर येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयांची आहे. यामुळे वेदांता महाविद्यालयात रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेडची संख्या अपुरी आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणे असलेल्या पण चाचणी अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे. या रुग्णांसाठी रेडक्रॉस या रुग्णालयात सोय आहे. मात्र, सद्यस्थितीत ते सुद्धा पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे १० पेक्षा अधिक रुग्णांचा जीव उपचारा अभावी गेला आहे. यामुळे सोशल मीडियावर पालिकेच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

पालिका नवीन जागांच्या शोधात

रुग्णालय उभारण्यासाठी पदभार स्विकारल्यानंतर डॉ. राजा दयानिधी यांनी पालिकेच्या ज्या मालमत्ता खाजगी व्यक्तींना दिल्या आहेत, अशा मालमत्तांची पाहणी केली. कॅम्प ३ मधील पालिकेचा टाऊन हॉल आणि जलतरण तलाव यांची पाहणी करून रुग्णालय उभारता येईल का? याबाबत नियोजन सुरू आहे.

- Advertisement -

रूग्णालयासाठी महाविद्यालयांचा वापर योग्य ठरेल

तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बदली होण्यापूर्वी आर. के. तलरेजा आणि चांदीबाई या दोन महाविद्यालयाची पाहणी केली होती. तसेच संस्थाचालकांबरोबर चर्चा देखील झाली होती. तलरेजा महाविद्यालयातील दहा वर्ग देशमुख यांनी ताब्यात ही घेतले होते. तलरेजा महाविद्यालयात ५०० आणि या महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या न्यु इरा शाळेत ५०० रुग्णांची राहण्याची सोय होऊ शकते. मात्र, देशमुख यांची बदली झाल्यानंतर हा विषय रेंगाळला.

कर्मचारी वर्ग अपुरा

कोरोना पोझिटिव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले ४०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. हे रुग्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, आय.ती.आय. नवीन इमारत आणि वेदांता कॉलेज येथे उपचार घेत आहेत. तसेच काही रुग्ण डॉल्फिन आणि सेंट्रल पार्क येथे उपचार घेत आहेत. पालिकेच्या तीन सी.सी.सी. केंद्रावर नियुक्त करण्यासाठी पालिकेकडे डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय नाहीत. मात्र, एखादे महाविद्यालय घेऊन तिन्ही ठिकाणचे सर्व रुग्ण एकत्र आणल्यास पालिकेच्या कर्मचारी वर्गावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल.


हेही वाचा – मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता ‘सेरो सर्वेक्षण’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -