घरमुंबईराज्यपालांना हटवणे एका मिनिटाचे काम, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

राज्यपालांना हटवणे एका मिनिटाचे काम, डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. पुण्यातील मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्याचीच प्रचिती आली. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांना हटवणे तर एका मिनिटाचे काम असल्याचे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला असल्याने राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद उभा राहिला आहे.

त्यातच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद थेट पुण्यातील पंतप्रधानांच्या जाहीर कार्यक्रमात देखील उमटल्याचे दिसून आले. या मुद्यावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांविषयी बोलले आहेत की नाही, माहीत नाही. पण जर राज्यपालांवर नरेंद्र मोदी बोलले असतील, तर त्या राज्यपालांना इथून उचलायला एक टेलिफोन पुरेसा झाला. जर खरेच मनात असेल, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल आणि राज्यपाल जे बोलले, ते चुकीचे वाटत असेल, तर त्यांना इथून हटवणे एक मिनिटाचे काम आहे, असे डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -