घरक्राइममुंबईतल्या 'त्या' महिलेच्या हत्येचा उलगडा, मुलीनेच केली विधवा आईची हत्या

मुंबईतल्या ‘त्या’ महिलेच्या हत्येचा उलगडा, मुलीनेच केली विधवा आईची हत्या

Subscribe

तिने आपल्या विधवा आईच्या शरीरावर वार देखील केले होते. तसंच आईचे हात-पायासह शरीराचे अनेक भाग कापून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कपाटात गेल्या तीन महिन्यापासून लपवून ठेवण्यात आला होता.

मुंबईच्या लागबागमधील एक फ्लॅटमध्ये कपाटात प्लॅस्टिक बॅगेत बांधून ठेवलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. हा मृतदेत एका ५३ वर्षीय महिलेचा असून अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर काही तासांतच या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मुंबईत मंगळवारच्या मध्यरात्री . लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरात असलेल्या एका फ्लॅटमधून रात्री उशिरा ग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या घराची पाहणी केली. कपाट तपासलं असता, त्यामध्ये प्लास्टिकची एक मोठी पिशवी आढळली. या पिशवीमध्ये एका ५० -५५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले फ्लॅट सील करण्यात आला.

- Advertisement -

या घटनेनं मुंबई पुरती हादरून गेली होती. पोलिसांनी सुद्धा या घटनेचा तपास अतिशय वेगाने सुरू केला. २४ तासांच्या आत या हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. या महिलेच्या मुलीवर संशय असल्याने पोलिसांनी तिला आधीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मुलीनेच आपल्या विधवा आईची हत्या केली असल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आली आहे.

रिंपल प्रकाश जैन असं या मुलीचं नाव असून ती २४ वर्षाची आहे. तिने आपल्या विधवा आईच्या शरीरावर वार देखील केले होते. तसंच आईचे हात-पायासह शरीराचे अनेक भाग कापून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कपाटात गेल्या तीन महिन्यापासून लपवून ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जवळपास १६ वर्षांपूर्वी महिलेचे पती प्रकाश जैन यांच्या मृत्यूनंतर ती आपल्या लेकीसह पालघरमधील विरारहून लालबाग येथे स्थलांतरित झाली. अशा कठीण प्रसंगात त्यांना महिलेच्या भावाने तिला प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून महिलेचा भाचा अनेकदा त्यांना भेटण्यासाठी येत असताना कोणते ना कोणते कारण देऊन ही मुलगी त्याला आपल्या आईसोबत भेटू देत नव्हती.

शेवटी महिलेच्या भाच्याने आपली आत्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांचे पथक लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंडमधील त्यांच्या घरी पोहोचताच मुलीने सुरुवातीला त्यांना आत जाऊ दिले नाही. आपल्या आत्या च्या चौकशीसाठी आलेल्या मामाच्या मुलालाही तिने घरातून हाकलून दिले. त्यावेळी घरात पोलिसांनी पाहणी केली असता कपाटात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, या मुलीने आपल्या विधवा आईची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली, याचा पोलीस शोध घेण्याचं काम करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपासात या महिलेचे मानसिक स्वास्थ्य चांगलं होतं की नाही याचीही पडताळणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्या आईची हत्या तिने कधी व कोणच्या मदतीने केली का, याचाही तपास पोलीस घेत आहेत. तसंच आईची हत्या केल्यानंतर इतके दिवस घरात मृतदेहासोबत राहणे का निवडले, याचीही चौकशी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -