घरमुंबईमहावितरणकडे कर्मचार्‍यांचा दुष्काळ

महावितरणकडे कर्मचार्‍यांचा दुष्काळ

Subscribe

म्हसळ्यात विजेचा लपंडाव

शहरासह तालुक्यात महावितरणकडे गेल्या दोन वर्षांपासून पुरेसा कर्मचारी नसल्याने वीज वितरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्याचा त्रास मात्र इमाने-इतबारे वीज बिले भरणार्‍या ग्राहकांसह उद्योजकांना सहन करावा लागत आहे. महावितरणला सध्या 29 कर्मचार्‍यांची गरज आहे.

महावितरणच्या म्हसळे उप विभागात म्हसळे शहर व ग्रामीण, मेंदडी, खामगाव, आंबेत ही पाच शाखा कार्यालये येतात. प्रत्येक ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे, तसेच वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे तांत्रिक बिघाड होत आहेत. संपूर्ण तालुक्यात वीजवाहक तारांचे जाळे पसरल्यामुळे एखाद्या छोट्याशा बिघाडामुळे एक अखंड शाखा कार्यालय अंतर्गत येणारा विभाग काळोखात बुडत आहे. या बिघाड दुरुस्तीसाठी नैसर्गिक अडचणीसोबत महावितरण निर्मित कर्मचारी तुटवड्याची अडचण आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात डोंगर, खाडीपट्टा आणि जंगल भागातून विजेच्या तारा गेल्यामुळे कर्मचारी तुटवड्याचा त्रास अधिक प्रमाणात जाणवत आहे. गेल्या वर्षभरापासून कर्मचारी तुटवडा असताना मे महिन्यात 4 कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर काही कर्मचारी आपल्या गावी बदली करून परत गेले.

- Advertisement -

नोकरीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले कर्मचारी नियमाप्रमाणे नोकरीची तीन वर्षे पूर्ण करून पुन्हा आपल्या गावी परत जातात. यामुळे कोकणात कर्मचार्‍यांचा तुटवडा कायमच राहतो. याचा फटका थेट ग्राहकांना बसत आहे. म्हसळे महावितरण उप विभागांतर्गत 84 गावे येत असून, सुमारे 50 हजार वीज ग्राहक आहेत. या गावातून वितरीत होणार्‍या विजेपोटी ९५ टक्के बिल वसुली होत. वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी आहे. ही बाब लक्षात घेता महावितरणने येथे पुरेसे कर्मचारी देणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने ग्राहकांना सध्याच्या परिस्थितीत तासनतास अंधारात रहावे लागत आहे, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

म्हसळे तालुक्याचा बराचसा भाग डोंगराळ असल्याने वादळी पावसात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. यंदाच्या पावसाळ्यात ग्राहकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येची बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, लवकरच यातून मार्ग निघेल.
– यादव इंगळे, कार्यकारी अभियंता, महावितरण, म्हसळे उप विभाग.

- Advertisement -

प्रत्येक विभागासाठी अकरा पदे मंजूर असताना
• मेंदडी विभागात सेक्शन इंजिनिअरसह 8 पदे रिक्त
• खामगाव विभागात सेक्शन इंजिनिअरसह 8 पदे रिक्त
• आंबेत विभागात सेक्शन इंजिनिअरसह 5 पदे रिक्त
• म्हसळे ग्रामीण विभागात सेक्शन इंजिनिअरसह 7 पदे रिक्त
• म्हसळे शहर विभागात एक असिस्टंट इंजिनिअरसह 5 पदे रिक्त
तर म्हसळे सब डिव्हिजनमध्ये असिस्टंट इंजिनिअरसह विभागीय लेखापालपद यांच्यासह 5 पदे रिक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -