घरमुंबईरक्तसंकलनासाठी सरकारकडून मोबाईल ब्लड बँक सुरू

रक्तसंकलनासाठी सरकारकडून मोबाईल ब्लड बँक सुरू

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला रक्ताचा तुटवडा, रक्तदानाचे घटलेले प्रमाण यावर मात करण्यासाठी राज्या सरकारने गुरुवारी दोन वातानुकुलित मोबाईल ब्लडबँक सुरू केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला रक्ताचा तुटवडा, रक्तदानाचे घटलेले प्रमाण यावर मात करण्यासाठी राज्या सरकारने गुरुवारी दोन वातानुकुलित मोबाईल ब्लडबँक सुरू केल्या. अत्याधुनिक वाहनांमुळे कमी जागेत व गृहनिर्माण संकुलांमध्ये जाऊन रक्तसंकलन करणे शक्य होणार आहे. या ब्लडबँकचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सर जे.जे. महानगर रक्तसंकलन केंद्र हे मुंबईतील सर्वात जास्त रक्तसंकलन करणारे केंद्र आहे. दरवर्षी या केंद्राकडून ३० हजार युनिट्स रक्त संकलन करण्यात येते. राज्यामध्ये २४ तास सुरू असणारे हे एकमेव केंद्र आहे. मात्र असे असले तरी कोरोनादरम्यान या रक्तकेंद्राला रक्त तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे तसेच रक्तदानासाठी त्यांना घरापासून दूर जावे लागू नये यासाठी राज्य सरकारने वातानुकुलित मोबाईल ब्लडबँक सुरू केल्या आहेत. रक्तसंकलन करणारी ही वाहने वातानुकुलीत असल्याने रक्तदात्यांना रक्तदानाच्या वेळेस त्रास होणार नाही. कोरोना काळात या वाहनांचा उपयोग करून जास्तीत जास्त रक्त संकलन करून गरजू रुग्णांना मदत करावी तसेच नागरिकांनी देखील रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरूण थोरात, रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -