घरमुंबईलोकलमध्ये तरुणीच्या विनयभंग, वॉण्टेड आरोपीस अटक

लोकलमध्ये तरुणीच्या विनयभंग, वॉण्टेड आरोपीस अटक

Subscribe

मुंबई : लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी वॉण्टेड आरोपीस बुधवारी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अय्याज सत्तार कुरेशी असे त्याचे नाव असून त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार तरुणी ही मूळची मणिपूरची रहिवाशी आहे. सध्या ती गोवंडीच्या देवनार परिसरातील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत मास्टर ऑफ सोशल वर्क, मानसिक आरोग्याच्या पहिल्या वर्षात शिकते. 11 सप्टेंबरला ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत फिल्ड वर्कसाठी रबाळे येथे गेली होती. सायंकाळी ती पुन्हा गोवंडी येथे येण्यासाठी वाशी रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी लोकलमध्ये चढताना एका अज्ञात तरुणाने तिला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता, मात्र गर्दीमुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केले. लोकल सुरू होताच याच तरुणाने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता.

- Advertisement -

हा प्रकार तिने तिच्या काही सहकार्‍यांना सांगितला होता. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. तिने वाशी रेल्वे पोलिसांत अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आरोपीचा शोध सुरु केला. ही शोधमोहीम सुरु असतानाच बुधवारी अय्याज याला कुर्ला येथून गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक केली. चौकशीत त्याने या तरुणीचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -