घरमुंबईराज्यातील युवापिढी व्यसनाधिन; ३ वर्षात हजारांहून अधिक तरुणांची आत्महत्या

राज्यातील युवापिढी व्यसनाधिन; ३ वर्षात हजारांहून अधिक तरुणांची आत्महत्या

Subscribe

गेल्या तीन वर्षांत अंमली पदार्थ आणि मद्यसेवनामुळे एकूण १ हजार ७५ तरुण-तरुणींना आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबईसह राज्यात वाढलेल्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचे आतापर्यंत अहवालातून समोर आले आहे. पण, यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण ही वाढले असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांत अंमली पदार्थ आणि मद्यसेवनामुळे एकूण १ हजार ७५ तरुण-तरुणींना आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

व्यसनामुळे होतात गंभीर आजार

तंबाखू, दारू, सिगारेट, ड्रग्ज ही उत्पादन सहज उपलब्ध होतात. यातून, तरुण व्यसनाधीन होतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४, २०१५ आणि २०१६ या वर्षात मद्यसेवन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनातून १८ ते ३० वयोगटातील एकूण १०६३ मुलं आणि १२ मुली अशा एकूण १०७५ तरुणांचा मृत्यू झाला आहे. व्यसनामुळे अनेक गंभीर आजार बळावतात. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. कमी वयात व्यसन लागत आहे आणि व्यसनांच्या आहारी गेलेली तरुण पिढी आत्महत्येचा मार्ग स्वीकारते, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.

- Advertisement -

अंमली पदार्थांमुळे तरुणपिढी न्यसनाधीन

अंमली पदार्थ आणि त्यांच्या आहारी जाणारी तरुण पिढी याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होते. १५ वर्षांखालील विद्यार्थी देखील या पदार्थांचं सेवन करतात. एखाद्यावेळेस ड्रग्स न मिळाल्यास ही पिढी नैराश्यात जाण्याच्या देखील घटना घडतात. अशा स्थितीत मनावरील तोल गेल्याने ही मंडळी स्वतःवर आघात करून घेतात. त्यामुळे, व्यसन हे तरुण पिढीच्या जीवावर बेतू शकतं, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात.

जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात

दरम्यान, अंमली पदार्थांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत महाविद्यालयीन स्तरावर जानेवारी २०१५ पासून ड्रग्ज फ्री कॅम्पस हा उपक्रम राबवला जात आहे. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री, दहिहंडी अशा उत्सवाच्या वेळी अंमली पदार्थ कक्षाच्यावतीने जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

- Advertisement -

हेही वाचा – 

व्यसनाधीन अल्पवयीनांवर पोलिसांची वक्रदृष्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -