घरमुंबईआमची एका युतीची पुढची गोष्ट - उद्धव ठाकरे

आमची एका युतीची पुढची गोष्ट – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या ५३व्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये भाजप-सेना युती ठाम असल्याचा पुनरुच्चार केला.

शिवसेचा ५३वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी भाजप-सेना युतीवर शंका घेणाऱ्यांना उत्तर दिलं. तसेच, शिवसेना-भाजप युती अबाधित राहील, असा विश्वास देखील व्यक्त केला. ‘२३ जानेवारी, १९ जून, १३ ऑगस्ट हे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी सणाचे दिवस आहेत. या दिवशी आम्ही फार काही वैचारिक वगैरे घेत नाही. पण निदान या दिवसांमध्ये एखादं हसरं-खेळतं नाटक ठेवावं. पण युती हे नाटक नाहीये. आम्ही आमच्या एका युतीची पुढची गोष्ट सांगणार आहोत. अशी भावना आधारित युती अशी कुणाची झाली असेल असं वाटत नाही’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Shivsena Anniversary Day
शिवसेना वर्धापन दिन

‘आता युतीमध्ये तंटा होणारच नाही’

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी युतीमध्ये भांडण निर्माण होण्याच्या शक्यतेला फेटाळून लावलं. ‘आमची युती झाल्यानंतर पुन्हा भांडण झालं तर? अशी शंका अनेकांनी उपस्थित केली. पण आम्ही ज्या ज्या मुद्द्यांवर भांडण होऊ शकतं, वाद होऊ शकतो, तेच मुद्दे आम्ही आधी स्पष्ट करून टाकले आहेत. त्यामुळे आम्ही युतीमध्ये वाद किंवा भांडण होऊच शकत नाही, अजिबात होणार नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – योग्य वेळी योग्य निर्णय सांगू – मुख्यमंत्री

‘पवार कुटुंब आहे तिथंच राहू देत’

‘आम्ही विरोधी पक्ष म्हणून वागत होतो, तर आम्ही तुमच्यासोबत आलो. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत होते. त्यांना टार्गेट करायचं मी ठरवत होतो, तर दुसऱ्या दिवशी तेच भाजपत आले. मी त्यांना म्हटलं, पवार कुटुंब आहे तिथंच राहू द्या, ते घेऊ नका’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -