Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बेस्टच्या डिजिटल तिकिटाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद; छपाईचा खर्च वाचणार?

बेस्टच्या डिजिटल तिकिटाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद; छपाईचा खर्च वाचणार?

Subscribe

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखर व्हावा आणि प्रवासादरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. तसेच, बेस्टच्या प्रवासापूर्वी तिकीट काढण्याकरीता प्रवाशांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बेस्टने या सगळ्यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी चलो अॅप, स्मार्ट कार्ड, मोबाईलवर तिकीट डाऊनलोड करणे या डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केला.

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखर व्हावा आणि प्रवासादरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. तसेच, बेस्टच्या प्रवासापूर्वी तिकीट काढण्याकरीता प्रवाशांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बेस्टने या सगळ्यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी चलो अॅप, स्मार्ट कार्ड, मोबाईलवर तिकीट डाऊनलोड करणे या डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केला. या डिजिटल तिकीट प्रणालीला सध्या प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४७ लाखांहून अधिक प्रवाशांनी मोबाईल तिकिटींगला पसंती दिली. (Mumbai BEST Bus Ticket Digital Ticket Paper Ticket Passengers)

बेस्टच्या डिजिटल तिकीट प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता कागदी तिकीट हद्दपार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे बेस्ट उपक्रमाच्या कागदी तिकीट हद्दपार होणार असून, दुसरीकडे बेस्टला वर्षाला अडीच कोटींचा फायदा होणार आहे. कारण खर्चाची बचत होणार आहे. शिवाय, प्रवाशांचाही खिशात तिकीट सांभाळा, रांगेत उभे राहण्याची गैरसोय दूर झाली आहे.

- Advertisement -

सध्या पेपरलेस तिकिटावर भर दिला असून, भविष्यात बेस्ट बसचा प्रवास तिकीटलेस होणार आहे. बसची वाट बघत तासंतास थांब्यावर थांबा, सुट्ट्या पैशांवरून प्रवासी व वाहक यांच्यात उडणारी शाब्दिक चकमक यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीवर भर दिला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत एसी बसेसही रस्त्यावर आणल्या आहेत.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेत इलेक्ट्रिक एसी बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा गारेगार प्रवास होत असून, डिजिटल तिकीट प्रणालीमुळे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची कटकट दूर झाली आहे. शिवाय, मोबाईल, स्मार्ट कार्ड या डिजिटल तिकीट प्रणालीमुळे सुट्टया पैशांवरून होणारा वादही संपुष्टात आला आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३,३२८ बसेस असून, दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करण्यास प्रवासी पुढाकार घेत आहेत. डिजिटल तिकीट प्रणालीत नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत असून, टॅप इन टॅप आऊटमध्ये मोबाइलमधील ब्लूटूथ सुरू ठेवल्यास ऑटोमॅटिक तिकीट डाऊनलोड होते. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत असल्याचे समजते. तसेच टॅप इन टॅप आऊट ही सुविधा पुढील काही दिवसांत सगळ्या बसमध्ये उपलब्ध करणार असल्याचे समजते. दरम्यान, डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर अधिकाधिक प्रवाशांनी करावा यासाठी सणासुदीच्या काळात विशेष ऑफर देण्यात येते.

एसी व विना एसी प्रवासाची सुविधा

बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी डिजिटल तिकीट प्रणाली अधिक आकर्षक बनवण्यासाठी नवीन बसपास योजना ७ एप्रिलपासून अंमलात आणली आहे. यात सुपर सेव्हर प्लॅन्स, विद्यार्थी पास, अमर्यादित राइड पास आणि ज्येष्ठ नागरिकांचे पास नव्या स्वरूपात आणले आहेत. या नवीन योजना प्रवासी वातानुकूलित आणि विना वातानुकूलित अशा दोन्ही बसेसमधून कोणत्याही योजनेसह प्रवास करू शकतात.

डिजिटल तिकीट प्रणालीतील सवलती

फेऱ्या          दिवस                     पैसे                           बचत

2           एक दिवस        12 रुपयांचे तिकीट 9 रु.          3 रु. बचत

4           एक दिवस        24 रुपयांचे तिकीट 15 रु.        9 रु. बचत

10         दोन दिवस        60 रुपयांचे तिकीट 28 रु.       32 रु. बचत

10         84 दिवस        60 रुपयांचे तिकीट 50 रु.        10 रु. बचत

15         7 दिवस          90 रुपयांचे तिकीट 59 रु.        31 रु. बचत

30        84 दिवस         180 रुपयांचे तिकीट 135 रु.     45 रु. बचत

50        84 दिवस         300 रुपयांचे तिकीट 210 रु.     90 रु. बचत

60        28 दिवस        360 रुपयांचे तिकीट 219 रु.      141 रु. बचत

100      28 दिवस        600 रुपयांचे तिकीट 279 रु.       321 रु. बचत

150      28 दिवस       900 रुपयांचे तिकीट 279 रु.        601 रु. बचत


हेही वाचा – पाकिस्तानच्या दिवाळखोरीला दहशतवाद जबाबदार, देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

- Advertisment -