घरक्राइमMumbai Crime: खलबत्याने ठेचून पत्नीने केली पतीची हत्या; मीरारोडमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai Crime: खलबत्याने ठेचून पत्नीने केली पतीची हत्या; मीरारोडमधील घटनेमुळे खळबळ

Subscribe

रमेशकुमार गुप्ता आमि राजकुमारी गुप्ता या दोघांमध्ये नेहमीच या ना त्या कारणाने वाद होत होते. पती-पत्नी यांच्या भांडणात पत्नीने आपल्या पतीची खलबत्याने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.

मीरा भाईंदर : मिरारोडमधील शांतीनगर-2 भागात स्वामी नारायण मंदिरा समोरील आनंद सरिता ए-9 या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने तिच्याच पतीची चक्क खलबत्याने ठेचून हत्या केली. ही घटना 24 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. रमेशकुमार गुप्ता असे मृतकाचे तर राजकुमारी गुप्ता असे आरोपी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime: Wife kills husband by crushing him with a knife; Excitement due to the incident in Mira Road)

याबाबत माहिती अशी की, रमेशकुमार गुप्ता आमि राजकुमारी गुप्ता या दोघांमध्ये नेहमीच या ना त्या कारणाने वाद होत होते. पती-पत्नी यांच्या भांडणात पत्नीने आपल्या पतीची खलबत्याने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्याची माहिती मिळताच नया नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे.

- Advertisement -

स्थानिकांनी केला कंट्रोल रुमला फोन

रमेशकुमार गुप्ता आहे आजारी असल्याचीही माहिती मिळत आहे. तर त्यांच्या पत्नी राजकुमारी गुप्ता (55) हि सुद्धा मानसिक आजारी असल्याची माहिती मिळात आहे. तर आपल्या पतीशी झालेल्या भांडणात गुरुवारी दुपारी तीन वाजता घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक वॉचमॅन व शेजारी लोकांनी डायल 112 ह्या कंट्रोल रूमला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी सदरील घटना स्थळावर जाऊन पाहणी केली.

हेही वाचा : धक्कादायक: धनाच्या लोभापायी आईचा आपल्याच मुलीला जाळण्याचा प्रयत्न

- Advertisement -

आरोपी महिला ताब्यात

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी रमेशकुमार गुप्ता (58) याचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या डोक्यात घरातील खलबत्याने जबर मारहाण करून हत्या झाल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार मृतकाच्या पत्नीने केला असल्याने पोलीसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. तर सदरील गुन्ह्याचा अधिक तपास नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे हे करत आहेत.

हेही वाचा : Manish Jain : आम्हाला न्यायाची अपेक्षा; दोन दिवसांच्या ED चौकशीनंतर मनीष जैन यांची प्रतिक्रिया

मुलीच्या संसार विस्कटल्याने वृद्ध आईची आत्महत्या

मीरारोड मध्ये राहणाऱ्या 71 वर्षीय वृद्ध आईने आपल्या मुलीचा संसार विस्कटल्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार 23 ऑगस्ट रोजी दुपारी घडला. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास नया नगर पोलीस करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव मीना दमानी असे असून, पोटच्या मुलीच्या संसाराची झालेली राखरांगोळी न पाहवल्याने त्यातूनच वर्षा पारेख हिचा होणारा त्रास सहन न झाल्याने वृद्ध दमानी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिरारोडच्या शांती नगर सेक्टर -2 मध्ये चार मजली प्रेमकिरण इमारत असून, बुधवारी दुपारी दमानी या गच्चीवर गेल्या. खुर्ची ठेवून त्या कठड्यावर चढल्या आणि तेथून उडी मारून स्वत:चे जीवन संपिवले. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -