घरमुंबईट्रॅफिकच्या ई-चलानचा गोंधळ; कारसाठी पाठवलं 'नो हेल्मेट'चं चलान!

ट्रॅफिकच्या ई-चलानचा गोंधळ; कारसाठी पाठवलं ‘नो हेल्मेट’चं चलान!

Subscribe

ट्रॅफिकचे नियम पाळणं हे सगळ्यांवर बंधनकारक असतं. ते पाळले नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला आर्थिक दंड देखील होतो. ट्रॅफिक विभागाकडून वारंवार याविषयी कारवाई केल्याच्या बातम्या देखील आपण ऐकत असतो. त्यासाठीच गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना थेट ई-चलान पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे अशा लोकांना थेट त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या दंडाचं चलान मिळू लागलं. पण यामध्ये अनेकदा गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसाच एक अजब प्रकार मुंबईच्या कांदिवली पूर्व भागात घडला आहे. ट्रॅफिक विभागाकडून पाठवल्या जाणाऱ्या या चलानमध्ये कसा गोंधळ होऊ शकतो, याचं हे अस्सल उदाहरण ठरावं.

आता कारमध्ये हेलमेट घालायचं का?

हमीर जोशी यांच्याकडे टाटा हॅरिअर कार आहे. एरवी कोणत्याही व्यक्तीला अकारण थांबवून कागदपत्र, लायसन्स, कार्ड असं बरंच काही विचारत असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना एकदाही अडवलं नाही की विचारणा केली नाही. पण शुक्रवारी दुपारी अचानक त्यांच्या मोबाईलवर त्यांना ७ ते ८ ई-चलान आले. त्यामध्ये अनेक कारणांखाली त्यांना दंड आकारण्यात आला होता. त्यातल्या एका चलानमध्ये त्यांना हेल्मेट नसल्याच्या कारणावरून दंड आकारला आहे. आता कारमध्ये बसणाऱ्या हमीर जोशी यांना हेल्मेटसाठी दंड कसा आकारला जाऊ शकतो? असा प्रश्न पडला आहे.

माझ्याकडे टाटा हॅरिअर आहे. पण मला ड्रायव्हिंग करताना कोणत्याही पोलिसाने अडवलं नाही किंवा माझ्याकडे कागदपत्र मागितली नाहीत. पण आज आलेल्या चलानमध्ये कागदपत्र नसल्यावरून आणि हेल्मेट न घातल्यावरून मला दंड आकारला आहे. आता कारमध्ये बसलेल्या माणसाने हेल्मेट घालणं ट्रॅफिक विभागाला अपेक्षित आहे का?

हमीर जोशी, नागरिक

- Advertisement -

 

bike
ई-चलानसोबत हमीर जोशींना आलेल्या बाईकचा फोटो

विशेष म्हणजे, या चलानसोबत हमीर जोशींची कार असताना फोटो मात्र टू व्हीलर गाडीचे पाठवले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक विभागाचा हा ‘कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा’ लागल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग करून ट्वीट केलं. त्यावर त्यांना मुंबई पोलिसांच्या मेडिया सेलला मेलवर तक्रार करायला सांगण्यात आलं आहे. आता हमीर जोशींना कधी न्याय मिळेल हे जरी आत्ताच सांगता येत नसलं, तरी या प्रकारानंतर ई-चलान प्रक्रियेमधलं ‘मिस-कम्युनिकेशन’ ढळढळीतपणे समोर आलं आहे हे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -