घरमुंबईतुम्ही आधी उद्धव ठाकरेंचे रिपोर्ट द्या, मग मी माझे रिपोर्ट देते; नवनीत...

तुम्ही आधी उद्धव ठाकरेंचे रिपोर्ट द्या, मग मी माझे रिपोर्ट देते; नवनीत राणा यांचे शिवसेनेला प्रत्युतर

Subscribe

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरआय रुमधील उपस्थितांना बोलवण्याची मागणी करत त्यांनी एमआरआय खरोखर केला का? असा सवाल उपस्थित केला.

खासदार नवनीत राणा यांनी लिलावात रुग्णालयातील एमआयआर कक्षात काढलेले फोटो समोर आल्याने शिवसेनेने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार  मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी  लीलावती रुग्णालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. नवनीत राणांचा एमआरआय काढताना फोटो कुणी काढले? एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा पोहोचलास कसा? नवनीत राणांना स्पॉंडिलायटीस असताना उशी का दिली? रुग्णाबरोबर एकालाच राहण्याची परवानगी असताना चार जण कसे होते? अशी प्रश्नांची सरबत्ती  किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी अधिकाऱ्यांवर केली. तसेच त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत, असेही सांगितले.

यावर आता नवी दिल्लीत पोचलेल्या नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी लीलावतीमध्ये एमआरआय केला आहे. पण दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी त्यांचा रिपोर्ट मागितला का? आधी त्यांनी त्यांचे रिपोर्ट द्यावे मग मला रिपोर्ट मागावा. मी सर्व रिपोर्ट पुराव्यासह देईन. कोणाच्या खासगी रिपोर्ट मागणे सरकारचे काम नाही, अशा शब्दात नवनीत राणा यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत.  त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी करु शकतात. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे, अशीही टिका राणा यांनी केली.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरआय रुमधील उपस्थितांना बोलवण्याची मागणी करत त्यांनी एमआरआय खरोखर केला का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालयाचे सीईओ आणि डॉक्टरांनी हो अस उत्तर दिलं. त्यावेळी राहुल कानाल यांनी या सगळ्याचा पुरावा देण्याची मागणी करत एमआयआर झालंच नाही हे सिद्ध केलं तर? असा सवाल उपस्थित केला.

यादरम्यान, लिलावतीचे सीईओंनी “आम्ही सेक्युरीटी ऑफिसरवर कारवाई करू. पेशंट आत गेला. त्यांच्यासोबत स्टाफ जातो. त्यांना किती वेळ लागेल माहीत असतं. त्यावेळी दुर्देवाने दरवाजा उघडा होता. नेहमी दरवाजा बंद असतो”, असं सीईओने सांगितलं. त्यावर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी आक्षेप घेतला. एमआयआर करताना कधीच दरवाजा उघडा ठेवला जात नाही. मग दरवाजा उघडा होता असं कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -