घरताज्या घडामोडीगिरगाव चौपाटीजवळील प्रेक्षक गॅलरी उभारताना सीआरझेडचे उल्लंघन, नितेश राणेंचा आरोप

गिरगाव चौपाटीजवळील प्रेक्षक गॅलरी उभारताना सीआरझेडचे उल्लंघन, नितेश राणेंचा आरोप

Subscribe

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी पैशांचा गैरवापर होत असेल तर आमचा त्याला विरोध आहे. मुंबई महानगरपालिकेने गिरगाव चौपाटीवर व्हिविंग गॅलरी उभारली आहे. ही प्रेक्षक गॅलरी लवाहिणीवर उभारण्यात आली असून सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नियम धाब्यावर बसवून काम सुरु असेल तर त्याला आमचा विरोध आहे असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिकेने गिरगाव चौपाटीवर प्रेक्षक गॅलरी उभारली आहे. या गॅलरीचे काम करताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले की, मुंबईचा पर्यटन दृष्टिकोणातून विकास झाला पाहिजे. मुंबई सुशोभित झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण पर्यटन मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा गैरवापर होत असेल आणि निमय धाब्यावर बसवत असतील तर त्याला आमचा विरोध राहिल. मुंबई महानगरपालिकेने गिरगाव चौपाटीवर व्हिविंग गॅलरी उभारली आहे. ही गॅलरी पर्जन्य जलवाहिनीवर उभारली आहे. समुद्रात पिलर टाकण्यात आले आहेत. सीआरझेडचे कुठलेही नियम पाळण्यात आले नाही. पर्यटनच्या नावाखाली अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला हाताशी धरून जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरु असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

- Advertisement -

कारवाई करा अन्यथा न्यायालयात जाऊ

नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना इशारा दिला आहे. आमची एवढीच मागणी आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत यावर कारवाई करावी नाहीतर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -