Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई आता ऑनलाईन अभ्यास नको, लवकर शाळा सुरु करा, मुंबईकर पालकांची मागणी

आता ऑनलाईन अभ्यास नको, लवकर शाळा सुरु करा, मुंबईकर पालकांची मागणी

एससीईआरटीच्या सर्वेक्षणाअंतर्गत चक्क 81 टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहेत.

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. अशातच आर्थिक,औद्योगिक,राजकीय, सामाजीक क्षेत्राला याचा खूप मोठा फटका बसला आहे. याचबरोबर कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने लोकांच्या सुरक्षीतते अंतर्गत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. लॉकडाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. यामुळे गेल्या दीड वर्षापासून मुलांची शाळा कॉलेज सुद्धा बंद ठेवण्यात आले असून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबण्यात आला आहे. मात्र पालक प्रत्यक्षात शाळेचे दरवाचे कधी उघडतील याची वाट पाहत आहेत. एससीईआरटीच्या सर्वेक्षणाअंतर्गत चक्क 81 टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहेत. त्यात मुंबईमधील एकूण 1 लाख 10हजार 193 पालकांचे सर्वेक्षणात मत जाणून घेण्यात आले. तसेच यामध्ये पालिका विभागातील 70 हजार 842 तर मुंबई उपसंचालक विभागातील 39 हजार 351 पालकांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.

सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार मुंबई शहरात आटोक्यात येत आहे. तसेच मुंबईत अनलॉकची प्रक्रीय सुरू झाली आहे. पण अद्याप संपुर्णपणे नियम हटवण्यात आले नाहीत. इतकेच नाही तर मुंबईमध्ये प्रवासाठी अनेक शिक्षकवर्ग तसेच इतर विद्यार्थीना लोकलचा प्रवास करुनच शाळेत किंवा कॉलेज गाठावे लागते. पण अद्याप मुंबई लोकल ट्रेन शिक्षकांसाठी तसेच विद्यार्थासांठी सुरू करण्यात आली नाहीये. मात्र ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचनी निर्माण होत असून, किमान आठवड्यातून एक दिवसाआड 4 ते 5 तसांकरीता वर्ग भरवण्याची विनंती पालकांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबई मुख्यध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार याच्या मते शाळा सुरू करण्याचा निर्णय जर शिक्षण विभागाने घेतला तर यापुर्वी शाळांना त्यांनी वेतनेतर अनुदान द्यावे. तसेच शाळेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्यासठी तसेच शिक्षक,विद्यार्थी यांचे लसीकरण करण्यात यावे. इतकेचं नाही तर शाळेमध्ये थर्मामीटर,ऑक्सिमीटर,सॅनिटायझर यासारख्या सुविधां सरकारने उपलब्ध करुन द्याव्या अशी मागणी सचिवांने केली आहे.हे हि वाचा – Ola-Uber Fare Hike: मुंबईत Ola-Uber प्रवास महागला; १५ टक्क्यांनी वाढले भाडे!- Advertisement -

 

- Advertisement -