घरताज्या घडामोडीकामाठीपुराचे 'कोरोनामुक्ती मिशन'!

कामाठीपुराचे ‘कोरोनामुक्ती मिशन’!

Subscribe

कामाठीपुरा म्हणजे रेड लाईट एरिया नसून येथील झोपडपट्ट्यांप्रमाणे इमारती आणि चाळींमधील बकालपणा आणि दाटीवाटीची घरे असणाऱ्या या परिसरात पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात महापालिकेला यश आले आहे.

कामाठीपुरा म्हटले म्हणजे डोळयासमोर येतात लाल बत्तीचा परिसर अर्थात रेड लाईट एरिया. परंतु कामाठीपुरा म्हणजे काही रेड लाईट एरिया नसून त्या कामाठीपुऱ्यात वेश्या व्यवसाय चालणाऱ्या दोन चार गल्ली आणि इमारती सोडल्या तर या कामाठीपुरात निवासी आणि व्यावसायिक मोठ्याप्रमाणात राहत आहेत. मात्र, झोपडपट्ट्यांप्रमाणे इमारती आणि चाळींमधील बकालपणा आणि दाटीवाटीची घरे असणाऱ्या या परिसरात पूर्णपणे कोरोनामुक्त करण्यात महापालिकेला यश आले आहे. आणि याचे श्रेय जाते गौराबाई आरोग्य केंद्र आणि सिध्दार्थ नगर आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि त्यांच्या टिमला आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना.

भायखळ्याच्या ई विभागात एका बाजुला झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत असताना, रेड लाईट एरियासह संपूर्ण कामाठीपुरा परिसरात याचा संसर्ग नियंत्रणात राखण्याचा प्रयत्न आरोग्य केंद्रातील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. दर्शन पाटील आणि डॉ. वृक्षाली महाजन यांच्या टिमने मोलाचे कार्य केले.

- Advertisement -

भायखळा, माझगाव, नागपाडा, कामाठीपुरा, चिंचपोकळी, दारुखाना आदी परिसरांच्या महापालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पहिल्या दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागली होती. मे महिन्यानंतर या ई विभागाने आपला दुसरा तसेच तिसरा क्रमांक सोडला नव्हता. परंतु, आता ‘ई’ विभाग एकूण ३१८६ रुग्ण संख्येबरोबरच २४ विभाग कार्यालयांमधील रुग्ण संख्येच्या क्रमवारीत १२ व्या स्थानी गेला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाढलेल्या या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न परिमंडळ एकचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या ई विभागाचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर, तत्कालिन प्रभारी सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र गुज्जर आणि डॉ. शरद तिवारी यांच्या टिमने वाखाण्याजोगे केलेले काम आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मिळालेले सहकार्य या बळावरच हे शक्य झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या या ई विभागातील कामाठीपुरा ग्रीन झोन झाल्याची चर्चा चांगली आहे. मात्र, हा कामाठीपुरा ग्रीन झोन करण्यात येथील गौराबाई आरोग्य केंद्रासह सिध्दार्थ नगर आरोग्य केंद्राचा मोठा हातभार आहे. गौराबाई आरोग्य केंद्राचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन पाटील यांनी याबाबत बोलतांना स्पष्ट केले की कामाठीपुरा म्हणजे काही रेड लाईट एरिया नाही. यातील काही गल्ली या रेड लाईट एरिया आहेत. परंतु, एक गोष्ट खरी आहे की या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येताच कामाठीपुरातील रेड लाईट एरियामध्ये जाऊन सर्व प्रथम याबाबत जनजागृती केली होती आणि सुदैवाने या रेड लाईट एरियामध्ये एकही रुग्ण सुरुवातीपासून आढळून आला नाही. विशेष त्या वस्तीत ये-जा नसून स्थानिक पोलिसांनी तिथे कडक पहारा दिल्यामुळे तिथे कोणी जात नव्हते. त्यामुळेच त्या वस्तीत कोरेानाचा संसर्ग होऊ शकला नाही. परंतु, हा रेड लाईट एरिया वगळता कामाठीपुरातील अन्य परिसरांमध्ये विशेष मेहनत घ्यावी.

- Advertisement -

सिध्दार्थ नगर आरोग्य केंद्रातील डॉ. वृक्षाली महाजन, डॉ. ईवाद सय्यद, डॉ. अनुपम बोराडे, रेखा किरवे, नेहा कामतेकर, दिक्षा सोनी, संचित पवार या नर्स, आरोग्य सेविकांसह आकीज काझी, जावेद काझी, शाहरुख काझी, निकद आदींच्या टिमने या भागातील प्रत्येक इमारत, गल्ली आणि वस्तींमध्ये जावून सुमारे दहा हजारांहून अधिक लोकांची तपासणी केली. यामध्ये २५० लोकांची कोरोना चाचणी केली. या आरोग्य केंद्रांच्या हद्दीत एकूण ३१ आरोग्य शिबिर आयेाजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या हद्दीत आढळून आलेल्या २५० रुग्णांपैकी २०३ रुग्ण हे आमच्या टिमने शोधून काढले होते, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या अति निकटच्या संपर्कातील संशयित रुग्णांना उचलून डि.बी. रियल्टीच्या जागेत त्यांना क्वारंटाईन केले जायचे. दिवसा तसेच रात्री जसे निरोप मिळायचे. तसेच झपाटल्यासारखी माझी टिम काम करायची. त्यामुळे सरुवातीच्या अडीच महिन्यांमध्ये तर डोळ्याला डोळालाही लागायला फुरसत नव्हती. कधी डोळ्यावर झापड असायची तर कधी शरीर गळपाटल्यासारखे व्हायचे. पण, समोर कारेाना रुग्ण पाहिल्यानंतर हा थकवा निघून जायचा आणि रुग्णाला दाखल करून त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करत सर्व सोपस्कार पार पाडले उसंत घ्यायचो. यात स्थानिक नगरसेवक जावेद जुनेजा यांचे मोठे सहकार्य लाभले होते. एवढेच नाही तर हायरिस्कमधील रुग्णांना नेल्यानंतर किटक नाशक विभागाचे कर्मचारी सॅनिटायझेशनसाठी तैनातच असायचे. त्यामुळे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. गुज्जर आणि डॉ. तिवारी यांच्याकडून सहकार्य मिळत गेल्यामुळेच कामाठीपुरातील कोरेाना नियंत्रणात यश मिळवण्या यश आले आहे. आज हे यश दिसत असले तरी मागील तीन महिने आम्ही आमच्या घरीच गेले नव्हतो. घरापासून दूर राहून आमची टिम मिशन कोरोनामुक्तीच्या दिशेने काम करत होते आणि त्यात आम्हाला मिळालेले यश हे नक्की सुखावणारे असल्याचे डॉ. पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.


हेही वाचा – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक; ४७ नव्या रुग्णांची वाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -