घरमुंबईशिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठात पार्किंग व्यवस्था! विद्यार्थी संघटना आक्रमक होण्याची...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठात पार्किंग व्यवस्था! विद्यार्थी संघटना आक्रमक होण्याची शक्यता

Subscribe

कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या संकुलात येणाऱ्या चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स जवळील मोकळी जागा आणि त्याचसोबत कुलगुरूंचे निवासस्थान यांच्यासह समोरील मोकळी जागा ही दसरा मेळाव्या साठी येणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची पार्किंग करण्यासाठी देण्यात येणार आहे.

शिंदे गट(cm eknath shinde) आणि शिवसेना (shivsena) या दोघांकडूनही दसऱ्या मेळाव्याची (dasara melava) जय्यत तयारी करण्यात येत. कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी होणार आणि कोणाचा दसरा मेळावा गाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. दरम्यान शिंदे गटाच्या डासार मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या वाहनांच्या पार्किंग साठी मुंबई विद्यापीठाची (mumbai university) जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्याविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. युवासेनेने या प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी विदयार्थी सेने आणि छात्र भरती संघटना यांनी सुद्धा यासाठी विरोध दर्शवला आहे.

हे ही वाचा – एक तरफ बेईमान, एक तरफ निष्ठावान…; अरविंद सावंतांची शिंदे गटावर टीका

- Advertisement -

कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) संकुलात येणाऱ्या चित्रनगरी मैदान, नॅनो सायन्स जवळील मोकळी जागा आणि त्याचसोबत कुलगुरूंचे निवासस्थान यांच्यासह समोरील मोकळी जागा ही दसरा मेळाव्या साठी येणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची पार्किंग करण्यासाठी देण्यात येणार आहे. या वृत्तानंतर मोकळी जागा ही दसरा मेळाव्याच्या वाहनतळसाठी देण्यात येणार आहे.

या बातमीनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि या वाहनतळाच्या व्यवस्थेला विरोध करून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी(bkc) मैदानावर होत आहे. याच मेळाव्यासाठी हजारो कर्यक्रते बीकेसी मैदानावर येणार आहेत. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या वाहनांची पार्किंग मुंबई विद्यापीठाच्या आवारात केल्याने नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याविरोधात युवसेने बरोबरच राष्ट्रवादी विदयार्थी सेने आणि छात्र भरती संघटनासुद्धा आक्रमक झाली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – चिठ्ठी आयी है.., कार्यकर्त्याची चिठ्ठी येताच भरसभेत अजित पवारांनी गुणगुणलं गाणं

‘मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm ekanath shinde) यांच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची जी वाहने येणार आहेत, त्यांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळाली. जवळपास 30 जेसीबी लावून गवत साफ करण्याचे कामसुद्धा सुरू आहे. याच संदर्भांत मागील अनेक दिवसांपासून मागणी करून सुद्धा हे काम होत नव्हतं. तेच काम आता केले जात आहे आणि विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या जागेवर अशा प्रकारे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची पार्किंगची केली जात आहे. या सगळ्याचा छात्र भारती निषेध करत आहे’. असं छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले म्हणले.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -