घरमुंबईRamdas Athawale : आठवले म्हणाले, माझ्या 'या' मागण्या भाजपकडून मान्य..!

Ramdas Athawale : आठवले म्हणाले, माझ्या ‘या’ मागण्या भाजपकडून मान्य..!

Subscribe

महायुतीत स्थान न दिल्याने रामदास आठवले कालपर्यंत नाराजी व्यक्त करत होते. आज त्यांनी देवेंद्र फडणीसांची भेट घेतल्यानंतर लोकसभा निवडणुकीची कसर भरून काढणाऱ्या मागण्या भाजपने मान्य केल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाला एकही जागा न सोडल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे काल गुरुवारी त्यांनी पुण्यात ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. मात्र, अवघ्या 24 तासांतच त्यांनी ‘आम्ही देशात एनडीए आणि राज्यात महायुतीसोबत आहोत’ असं सांगत नाराजी दूर झाल्याचे संकेत दिले. एवढंच नाही तर आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आठवले यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने कोणकोणती आश्वासने दिलीत, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा… Mahayuti : रिपाइंला झालेली जखम कशी भरून काढणार? रामदास आठवलेंचा फडणवीसांना सवाल

- Advertisement -

या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात रिपाइंला (आठवले गट) कुठेही विचारात न घेतल्याने रामदास आठवले वारंवार नाराजी व्यक्त करत होते. अखेर आज त्यांनी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झालेली दिसली. या भेटीनंतर आपल्या मागण्या मान्य झाल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी आपण महायुतीतच राहणार असल्याचे सांगत एखादी जागा दिली असती तर बरे झाले असते, अशी खंतही व्यक्त केली. तसेच ईशान्य मुंबईची जागा द्यायला हवी होती, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

हेही वाचा… Rohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया

- Advertisement -

फडणवीसांची जादू…

रामदास आठवले यांनी गुरुवारी पुण्यात त्यांच्या पक्ष कार्यकारणीची बैठक घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्रात रिपाइंला (आठवले गट) एकही जागा न सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ‘एकला चलो रे’चा सूर आळवला होता. त्यासाठी त्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी त्यांच्या कानावर टाकली. त्यानंतर याबदल्यात आपण काही मागण्या केल्या असून त्या सगळ्या मान्य केल्याची माहिती आठवलेंनी दिली.

आठवलेंच्या मागण्या

आमच्या पक्षाला केंद्रात कॅबिनेटमंत्रीपद मिळाले पाहिजे शिवाय राज्यात मंत्रिपद हवे, शिवाय विधान परिषदेची एक जागा आणि होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 8 ते 10 जागा मिळायला हव्यात, अशा आठवलेंच्या मागण्याा आहेत. याशिवाय महामंडळांत अध्यक्षपद, उपाध्यपद, सदस्यपद मिळाले पाहिजेत अशीही मागणी त्यांनी केली आणि या मागण्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे रामदास आठवले यांनी माध्यमांना सांगितले.

लोकसभेच्या शिर्डी आणि सोलापूरच्या जागेसाठी रामदास आठवले आग्रही होते. या दोन्ही ठिकाणी उमेदवार तयार होते. पण भाजपने तेथे त्यांचे उमेदवार घोषित केले. त्यामुळे रिपाइंचे कार्यकर्ते नाराज झाल्याची भावना रामदास आठवले यांनी काल पुण्यात व्यक्त केली होती. यापूर्वी केंद्रात आणि राज्यात एक मंत्रिपद मिळेल, या आश्वासनाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्तता केलेली नाही, असेही आठवले म्हणाले होते. आणि आता रामदास आठवलेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या त्याच आश्वासनानंतर विश्वास ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -