घरक्राइमSalman Khan News : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना...

Salman Khan News : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही बिहारमधील रहिवाशी आहे. या आरोपींना मुंबईत आणून अधिक चौकशी केली जाणार आहे. सध्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत. (salman khan news mumbai crime branch arrested shooters involved in attack on residence)

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करत आरोपींना पळ काढला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास दोन आरोपी दुचारीवरून आले आणि त्यांनी चारवेळा सलमान खानच्या घरावर (गॅलॅक्सी अपार्टमेंटवर) गोळीबार केला. गोळीबारात एक गोळी खिडकीतून सलमान खानच्या घरात शिरली तर, एक गोळी भिंतीत शिरली होती. त्यावेळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली.

- Advertisement -

हेही वाचा – Salman Khan : सलमानच्या वांद्रे गॅलेक्सी आणि पनवेल फॉर्महाऊसची महिन्यांपूर्वी रेकी; तपासात माहिती उघड

दरम्यान, “गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. एका दिवसात दोन्ही आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींची ओळख पटवली आहे. मागील अहवालात असेही सांगण्यात आले होते की गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकावर खंडणी, खून इत्यादी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत”, असे गुन्हे शाखेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला धमकी दिली होती. त्यानंतर त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत जीवे मारण्याची धमकी देणारे फोन, ईमेल आणि पत्रेही आली होती. आता गुन्हे शाखेने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेले दोन्ही हल्लेखोर पनवेल परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. हे हल्लेखोर काही दिवसांपूर्वी हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास होते. तेथील घर मालकाशी केलेल्या करारनाम्याच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नवीन पनवेलमधील एका दुचाकी शोरूममधून गाडी विकत घेतली व त्यासाठीसुद्धा त्यांनी तेच कागदपत्रे दिले होते.


हेही वाचा – Crime News : ट्रॅव्हल्स कंपनीची फसवणूक प्रकरणी कर्मचार्‍याला अटक

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -