घरक्राइमCrime News : ट्रॅव्हल्स कंपनीची फसवणूक प्रकरणी कर्मचार्‍याला अटक

Crime News : ट्रॅव्हल्स कंपनीची फसवणूक प्रकरणी कर्मचार्‍याला अटक

Subscribe

कांदिवलीतील एका ट्रॅव्हल्स कंपनीची पावणेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कौशल राजेश शहा या सेल सल्लागार कर्मचार्‍याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. विदेशातील टूर्सची बोगस नोंद आणि तिकिट देऊन ग्राहकासह कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

मुंबई : कांदिवलीतील एका ट्रॅव्हल्स कंपनीची पावणेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कौशल राजेश शहा या सेल सल्लागार कर्मचार्‍याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. विदेशातील टूर्सची बोगस नोंद आणि तिकिट देऊन ग्राहकासह कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. (Employee arrested in case of travel company fraud)

दहिसर येथे राहणारे तक्रारदार कांदिवली येथील एका टूर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स कंपनीत ब्रॅच मॅनेजर म्हणून कामाला आहेत. गेल्या वर्षी कंपनीने कौशलची सेल सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीच्या ग्राहकांना भारतात तसेच भारताबाहेर जाण्यासाठी त्यांच्या गरजेप्रमाणे विविध पॅकेज तयार करून देत त्याची डिटेल माहिती जमा करून ती कंपनीत देणे, कंपनीच्या बँक खात्यातून ग्राहकांचे विमान तिकिटासह लॉजिंगची व्यवस्था करणे, ग्राहकांकडून आलेले पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा करणे आदी सर्व कामाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Crime News : फ्लॅटच्या आमिषाने कलादिग्दर्शकाला 30 लाखांचा गंडा

काही महिन्यांपूर्वी त्यांनी काही ग्राहकांकडून विदेशात जाण्यासाठी पेमेंट घेतले होते. मात्र ते पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या खात्यात जमा केले. कौशलने ही कंपनी त्याची सिस्टर कंपनी असल्याचे सांगून काही ग्राहकांची बोगस नोंद करत त्यांना बोगस तिकीट देऊन कंपनीची पावणेतेरा लाखांची फसवणूक केली.

- Advertisement -

हा प्रकार उघडकीस येताच कंपनीने कौशलला कामावरून काढून टाकले. तसेच त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कौशलविरुदध पोलिसांनी बोगस दस्तावेज, पैशांचा अपहार करत कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत तीन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – Mumbai Crime News : मोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीचा पत्नीवर हातोड्याने हल्ला

पोलिसाची कॉलर पकडल्याप्रकरणई तिघांना अटक

दरम्यान, पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच वाद घालून पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरा सव्वाच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटजवळ काहीजण जोरजोरात भांडण करत होते. एकमेकांसोबत वाद घातल्यानंतर त्यांनी पोलिसांशी भांडण सुरू केले होते. त्यामुळे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य करु नका, नाहीतर कारवाई करु असे सांगितले. तरीही ते पोलिसांशी वाद घालत होते. काही वेळानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक करचे यांना धक्काबुक्की करून कॉलर पकडून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून तिन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मंगेश रमेश पानपाटील, नितीन रमेश पानपाटील आणि अविनाश राजू खुपटे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही सोमवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -