घरमुंबई...म्हणून उद्धव ठाकरे माझ्यावर रागावले

…म्हणून उद्धव ठाकरे माझ्यावर रागावले

Subscribe

संजय राऊत यांनी केला खुलासा

डिस्चार्ज मिळाल्यानंतर बोलताना, तब्बेतीची काळजी न घेतल्याने उद्धव ठाकरे आपल्यावर रागावले होते असा खुलासा केला. तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.शिवसेना नेते संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि अँन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ. मॅथ्यू यांनी त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी केली. दोन दिवस विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले होते. अखेर बुधवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. अडीच- अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पुढच्या गोष्टी असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -