घरताज्या घडामोडीमुंबईकरांच्या लस साठ्यावर आगीचा परिणाम नाही; सीरमकडून आणखी साठा उपलब्ध

मुंबईकरांच्या लस साठ्यावर आगीचा परिणाम नाही; सीरमकडून आणखी साठा उपलब्ध

Subscribe

मुंबईकरांसाठी सीरमकडून आणखी १ लाख २५ हजार लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला.

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी भीषण आग लागून ५ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, ही दुर्घटना घडण्यापूर्वीच मुंबईकरांसाठी सीरमकडून आणखी १ लाख २५ हजार लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला. यापूर्वी १३ जानेवारीला मुंबईला सीरमकडून १ लाख ३९ हजार ५०० लसी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत मुंबईला २ लाख ६४ हजार ५०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु, या लसीकरणाला अपेक्षित यश लाभलेले नाही. विविध कारणास्तव लसीकरणात वाढ न झाल्याने पालिकेने आता नियमात शिथिलता आणून लाभार्थी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

लसीकरणाला अपेक्षित यश नाही

कोरोनाला रोखण्यासाठी अद्यापही ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला लसीची प्रतीक्षा होती. त्याप्रमाणे आता लस उपलब्ध होत आहे. मात्र, मुंबईसह भारतात अजून लसीकरणाला अपेक्षित यश लाभलेले नाही. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात येत आहे. परंतु, आता लसीकरणात वाढ होण्यासाठी पालिकेला विशेष जनजागृती करावी लागणार आहे.

- Advertisement -

लसीचा साठा पालिकेच्या परळ केंद्रात

उपलब्ध लसीचा साठा हा पालिकेच्या परळ येथील लस साठवणूक केंद्रात ठेवण्यात आल्याचे समजते. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरु झाली होती. पहिल्याच दिवशी १९२६ हेल्थकेअर वर्कर्संना लस टोचण्यात आली. तर त्यानंतर मंगळवारी १५९७ आणि बुधवारी १७२८ जणांना लस देण्यात आली. तीन दिवस राबवलेल्या लसीकरण मोहिमेत एकूण ४२५१ हेल्थकेअर वर्कर्सना लस टोचण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -