घरमुंबईशिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर प्राणघाती हल्ला

शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर प्राणघाती हल्ला

Subscribe

अज्ञात हल्लेखोरानी तलवारीने आमदाराव केला हल्ला. मेट्रो तीन प्रकल्पाच्या वादातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अणुशक्ती नगर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री मानखुर्द महाराष्ट्र नगर या ठिकाणी मोटारीतून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरानी तलवारीने हल्ला केला, मात्र या हल्ल्यात काते थोडक्यात बचावले असून त्यांचा अंगरक्षक आणि कार्यकर्ता असे दोघे जण जखमी झाले आहे. हा हल्ला मेट्रो तीन प्रकल्पाच्या वादातून झाला असल्याचा संशय आमदार तुकाराम काते यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी ट्रोमबे पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त (परिमंडळ६) शहाजी उमाप यांनी सांगितले.

काही दिवसांपासून सुरु होते आंदोलन

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरजवळ मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडचे काम मागील ६ महिन्यापासून सुरु आहे. या प्रकल्पात नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, तसेच या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे. या मागण्यांसाठी शिवसेनेनेचे खासदार राहुल शेवाळे व आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.
या प्रकल्पासाठी माती आणि डेब्रिज घेऊन येणारे डंपर महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्गाने ये-जा करतात. त्यातून माती आणि डेब्रिज रस्त्यावर सांडते, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. या डंपरमुळे अपघात होण्याची शक्यता देखील असल्यामुळे. डंपर जकात नाक्याकडील पर्यायी मार्गाने काढावे अशी मागणी करण्यात आली होती. तरिही वाहतूक त्याच मार्गाने होत असल्यामुळे माती आणि डे ब्रिज ची वाहतूक करणारे पाच डंपर काते यांनी ट्रॉम्बे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

- Advertisement -

टोळीने केला हल्ला

शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास आमदार तुकाराम काते हे आपल्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नगर या ठिकाणी नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडपात बसले होते. त्यावेळी दोन वाहनातून आलेल्या पाच जणांच्या टोळीने तलवारीने काते यांच्यावर हल्ला केला. मात्र काते यांचे अंगरक्षक यशवंत दुर्गुडे आणि कार्यकर्ते किरण सावंत हे हल्लेखोरांना रोखण्यासाठी पुढे आले असता त्यांच्यात झटापट झाली त्यात अंगरक्षक दुर्गुडे आणि सावंत हे जखमी झाले .दरम्यान हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात काते यांनी दिन ठेकेदारांचे नावे दिले असून त्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला असल्याची तक्रार काते यांनी केली. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त (परिमंडळ६) शहाजी उमाप यांनी सांगितले.

एका आमदारावर या प्रकारचा हल्ला होणे ही बाब गंभीर असून मुंबईचे बिहार झाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. या हल्ल्याची सखोल चौकशी हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. याबाबत आमदार तुकाराम काते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -