घरमुंबईराज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा - संजय राऊत

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा – संजय राऊत

Subscribe

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी संजय पवार यांचे नाव निश्चित केल्याची माहिती दिली. उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.  यावेळी संजय पवार (sanjay pawar) हा शिवसेनेचा कडवट मावळा आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे आहोत, पक्ष नेते पदाधिकारी हे मावळ्यांच्या जीवावर असतात, असा टोला संजय राऊत यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपती यांना लगावला.

हेही वाचा – Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा

- Advertisement -

संजय पवार हा शिवसेनेचा (shivsena) मावळा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. पण मी तुम्हाला माहिती देतो दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागी शिवसेनेचा उमेदवर विजयी होतील. कोल्हापूरचे (kolhapur) संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत. ते कडवट शिवसैनीक आहेत. ते एक मावळा आहेत. मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे आहोत, पक्ष नेते पदाधीकारी हे मावळ्यांच्या जीवावर असतात. या बाबत अधीकृत घोषणा लवकरच होईल. शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेची फाईल क्लोज झाली आहे, असे संजय राऊत यांनी सांगीतले.

हेही वाचा – संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, पण…, संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

संभाजीराजेंचा (Sambhaji Raje) नक्कीच आम्ही सन्मान ठेऊ, त्यांच्या कुटुंबाविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आम्हाल आदर आहे. त्यासाठीच आम्ही सहाव्या जागेसाठी तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यांना राज्य सभेवर जायचे आहे. त्यांना अपक्ष लढायचे आहे. आपक्ष लढण्यासाठी 42 मतांची गरज आहे. जर कोणाकडे 42 मत असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) जर अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे काय योजना आहे माहीत नाही. पण आमच्याकडे जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही छत्रपतींच्या गादीचा सन्मान आणि छत्रपतींच्या वंशजांच्या सन्मानाचा विचार करून शिवसेना तुम्हाला उमेदवारी देईल, शिवसेनेत प्रवेश करा. आम्हाल शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची आहे, असा प्रस्ताव दिल्याचे संजय राऊत म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -