घरमुंबईधारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारोपार, २४ तासांत ६६ नवे रूग्ण

धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारोपार, २४ तासांत ६६ नवे रूग्ण

Subscribe

धारावीतील कोरोना रूग्णांनी आज एक हजारांचा पल्ला गाठला

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत साधारण ८ ते १० लाख नागरिक राहतात. धारावीतील वस्ती अत्यंत दाटीवाटीची असल्याने कोरोनाचा धोका या भागात सुरूवातीपासून असल्याचे दिसते. त्यामुळे धारावीत कोरोना शिरू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान राज्यातील मुंबई आणि पुण्याची कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची परिस्थिती चिंताजनक आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारोपार

धारावीतील कोरोना रूग्णांनी आज एक हजारांचा पल्ला गाठला असून दिवसभरात ६६ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर आतापर्यंत धारावीमध्ये ४० जणांचा कोरोनाने बळी घेतल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धारावीतील कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनासमोर मोठं आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, धारावीतील माटुंगा लेबर कॅम्प, धारवी क्रॉस रोडसह ९० फुटी व ६९ फुटी रस्त्यांवरच अधिक रुग्ण आढळून येत असल्याने हे आता कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट बनत चालले आहे.

- Advertisement -

Corona: धारावीत कोरोना रूग्णांची वाढतेय संख्या; ‘हे’ बनले हॉटस्पॉट

माहिम परिसरात आतापर्यंत १५५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत माहिममध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी ३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -