घरमुंबईगोवंडी, देवनारच्या लोकांचे आयुष्यमान वाढले पाहिजे

गोवंडी, देवनारच्या लोकांचे आयुष्यमान वाढले पाहिजे

Subscribe

सर्वसाधारण मुंबईकरांचे आयुष्यमान हे ६९ वर्षे असते. पण मुंबईतील देवनार, गोवंडी भागातील नागरिकांचे आयुष्यमान हे अवघे ३९ वर्षे आहे. त्यामुळेच गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केले आहे. मुंबईत आयोजित वर्ल्ड टॉयलेट डेच्या निमित्ताने आयोजित परिसंवादात त्याने हे मत व्यक्त केले.

या भागात वैयक्तिक अस्वच्छतेचा परिणाम हा लोकांच्या आयुष्यमानावर होत आहे. त्यामुळेच सरासरी आयुष्यमान घटण्यावर त्याचा परिणाम होत आहे. माझ्या पत्नीने एका कार्यक्रमाला या भागातील नागरिकांशी संवाद साधला. मुंबईचाच भाग असलेल्या या लोकांना सध्या मदतीची गरज आहे. त्यासाठीच समाजातील घटकांनी, कॉर्पोरेट तसेच राज्य सरकारने आणि सामाजिक संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनाही चांगले वातावरण आणि स्वच्छ आरोग्य उपलब्ध होऊ शकेल. संपूर्ण मुंबईतील कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. पण याठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्याने म्हटले आहे.

- Advertisement -
जुहूला शौचालय

जुहू परिसरात जगभरातून लोक पर्यटनासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी उघड्यावर हागणदारी लाजवणारी अशी आहे. मी स्वतः असे प्रकार होताना पाहिले आहेत. म्हणूनच जुहू परिसरात हागणदारी थांबावी म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मदतीने या परिसरात पाच ते सहा शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उघड्यावर शौचाला जाण्यासाठी लोकांना मजा येते, पण यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम गंभीर आहे, अशी चिंता त्याने व्यक्त केली आहे.

पॅडमन प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवणे गरजेचे

चित्रपटांचा समाज जीवनावर गंभीर परिणाम होत असतो. टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपट सरकारने पुढाकार घेऊन खेडोपाड्यात दाखवला. तितकाच गंभीर विषय हा महिलांच्या मासिक पाळीचा आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने हा चित्रपटही पाहणे गरजेचा आहे, असेही त्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -