घरमुंबईमुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे - पालिका आयुक्त इक्बाल चहल

मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे – पालिका आयुक्त इक्बाल चहल

Subscribe

कप परेड आणि मरीन ड्राईव्ह येथील विकास कामांचे अधिकार पालिकेकडे असायला हवे

मुंबई महापालिकेच्या शिक्षण अर्थसंकल्प (BMC Budget 2021)आज सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पानंतर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बाोलताना त्यांनी २०२०-२०२१ च्या पालिका बजेटमध्ये १४ हजार ६३४ कोटी भांडवल रक्कम होती. त्यातील ३५ ते ४८ रक्कम म्हणजे एकूण १८ हजार कोटी एवढी रक्कम विकास कामांवर खर्च होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईचा विकास होण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण असायला हवे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कप परेड आणि मरीन ड्राईव्ह येथील विकास कामांचे अधिकार पालिकेकडे असायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचा विकास होण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण असायला हवे यासाठी आम्ही सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहोत. मुंबईतील कफ परेड, मरीन ड्राईव्ह या शहरांचे विकास कामांचे अधिकार एमएमआरडीएकडे आहेत. त्यामुळे येथील नागरिकांची मागणी आहे की आम्हाला बीएमसीमध्ये सामावून घ्या. त्यामुळे सरकराने जर याला परवागणी दिली तर या दोन्ही भागात बीएमसीचे अधिकार असणार आहे. यासाठी आम्ही लेखी प्रस्तावही सरकारला दिला आहे. अशी मागणी यावेळी आयुक्तांनी केली. या विकास कामातील महत्वाचा खर्च हा कोस्टल रोडवर करण्यात येणार आहे. यावर्षीच्या 2 हजार कोटींचा खर्च कोस्टल रोडसाठी असणार आहे, तर मिठी नदीच्या विकास खोलीकरण रुंदीकरणासाठी ३१७२ कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. तसेच देवनार कत्तलखाना यासाठी आम्ही निविदा काढतो आहे यासाठी 472 कोटी तरतूद करणार असल्याचे यावेळी चहल यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मराठी रंगभूमी कलादालनाच्या विकासासाठी पालिकेने विशेष तरतुद केली आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात ५ गार्डन तयार केले जाणार असून १६० किमीचे १४९ फुटपाथ बांधले जाणार आहेत. तसेच मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका व्हावी यासाठी पालिका 128 ट्राफिक आयलँड बांधणार आहे. तसेच मुंबईच्या प्रत्येक भागात एकूण २०,३०१ टॉयलेट बांधणार असून १०८ कम्युनिटी टॉयलेट्स बांधण्याची तरतुद या बजेटमध्ये आहे. मुंबईतील अंधेरी पुल दुर्घटनेनंतर पालिका आता रेल्वेच्या 12 पुलांचे काम हाती घेणार आहे. तसेच कोरोना काळात मुंबईतील हॉस्पीटल्सची दैना पाहता मुंबईत ५ नवे हॉस्पिटलसाठी निविदा मान्य केल्या आहेत. असे त्यांनी सांगितले.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -