घरमुंबईमुंबई ठाण्यातही अवकाळी पावसाला सुरूवात

मुंबई ठाण्यातही अवकाळी पावसाला सुरूवात

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रावर सध्या अवकाळी पावसाचे संकट असून हवामान खात्यानेही वीजाच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आधीच वर्तविला होता. त्यानुसार संध्याकाळी पुण्यात पावसाच्या सरी बरसल्यानंतर मुंबई आणि ठाण्यातही जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेच्या त्रासातून थोडावेळ सुटका मिळाली आहे.

मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. पश्चिम उपनगरात आज सकाळी बोरिवली, दहिसर तर ठाणे जिल्ह्यात डोंबिवली, मुंब्रा, कळवा, बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसात राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यात हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार मुंबईत आज पावसाने हजेरी लावल्याचे दिसत आहे. यामुळे दिवसभराच्या उकाड्यातून मुंबई आणि उपनगरवासीयांना तूर्त दिलासा मिळाला असला तरी या पावसानंतर उकाड्यात किती वाढ होणार याची चिंता मुंबईकरांना आतापासून लागली आहे.

- Advertisement -

आज संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पाऊस कमी पडला असला तरी हार्बर लाईनवर परिणाम झाला आहे. सीएसटी-कुर्ला या दरम्यान लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.

हेही वाचा – अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण : मुंबई गुन्हे शाखेकडून उल्हासनगरमध्ये छापेमारी

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात गारठा होता. मात्र, दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील तापमानात वाढ होत गेली. राज्यातील तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. फाल्गुनातच वैषाख वणवा पेटल्याने एप्रिल-मे महिन्याबाबत चिंता व्यक्त केली गेली. त्यातच, आजा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने तापमानात किंचित घट झाली आहे. परंतु, येत्या काळात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी
होळीच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर आठवडाभर शहरात ढगाळ वातावरणाचे चित्र पाहायला मिळत होते. त्यातच आज सकाळी तुरळक पाऊस पडल्यानंतर सायंकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी ठाणे शहरात पाहावयास मिळाल्या. दहा ते पंधरा पडलेल्या पावसाने मात्र ठाणेकर नागरिकांची चांगली तारांबळ उडाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -