घरमुंबईकांदळवन संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा, आदित्य ठाकरेंच्या सूचना

कांदळवन संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा, आदित्य ठाकरेंच्या सूचना

Subscribe

भारतीय वन अधिनियम कलम २० अंतर्गत अधिसूचना जारी करण्यावर प्रलंबित क्षेत्राची चौकशी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्षेत्रातील कांदळवन क्षेत्र सुरक्षित आणि संवर्धित करणे गरजेचे असून, संरक्षणासाठी अतिरिक्त मनुष्यबळासोबतच सीसीटीव्ही किंवा तत्सम अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल ? याचा अभ्यास करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. इतर काही शासकीय यंत्रणांच्या ताब्यात असलेले कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश यावेळो देण्यात आले. भारतीय वन अधिनियम कलम २० अंतर्गत अधिसूचना जारी करण्यावर प्रलंबित क्षेत्राची चौकशी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. (Use modern technology for Kandalvan conservation – Aditya Thackeray )

मुंबईतील ३९४८.५० हेक्टर पैकी ३९२३.२७ हेक्टर क्षेत्र, ठाणे जिल्ह्यातील ३४५०.२२ हेक्टर पैकी ३०९४.०४ हेक्टर क्षेत्र , पालघर जिल्ह्यातील ३०७३.५९ हेक्टर पैकी २०५६.९३ हेक्टर क्षेत्र तर रायगड जिल्ह्यातील ४४१९.५१ हेक्टर पैकी २९९७.७० हेक्टर क्षेत्र संवर्धनासाठी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची तसेच मुंबई उपनगरात विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतींचेही काम पूर्णत्वास येत असल्याचेही माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, कांदळवनचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे वन संरक्षक मल्लिकार्जुन, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, कांदळवनचे उपवनसंरक्षक निनु सोम राज, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे आदी उपस्थित होते.


हेही वाचा – आरेच्या ८१२ एकर जागेवर वन विभाग फुलवणार जंगल, वनसंपदेचे संवर्धन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -