घरमतप्रवाहभाग १० - मोरारजी देसाई आणि पवार साहेब...!

भाग १० – मोरारजी देसाई आणि पवार साहेब…!

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "साहेब माझा विठ्ठल" या सदराखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या घटनांवर आधारीत लेख लिहिले आहेत. त्या लेखांची ही मालिका.

पदाचा आणि आपल्या प्रसिद्धीचा कोणताही गर्व न बाळगता, केवळ आपल्या विचारधारेनुसार आचरण करणारी माणसं तशी दुर्मिळच असतात. त्यातल्या त्यात राजकारणात तर हा गुण तसा दुर्मिळच म्हणायला हवा. पण, असे लोक या देशाने वेळोवेळी पाहिले आहेत. त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्री.मोरारजी देसाई यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मोरारजी ही मुंबईत राहत असत. आधी मंत्री झाल्यावर ते दिल्लीला गेले.नंतर या देशाचे पंतप्रधान होण्याचा मान त्यांना लाभला. त्याकाळी पंतप्रधान असताना ते ज्यावेळी मुंबईत येत तेंव्हा,त्यांची सोय ही “राजभवन”वर होत असे.

पंतप्रधान पदाची खुर्ची सोडल्यावर ते मुंबईला त्यांच्या मुलाच्या घरी राहत. पुढे काही तांत्रिक अडचणीमुळे त्या मुलाला (कांतिभाई देसाई) ते घर सोडावे लागले,आणि परिणामी मोरारजींना म्हणजेच देशाच्या माजी पंतप्रधानानांच मुंबईत राहायची अडचण निर्माण झाली.

- Advertisement -

एक अतिशय प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिकांवर अशी वेळ येण पवारसाहेबांना रुचल नाही. तसं पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या वतीने मोरारजींना एखाद घर उपलब्ध करून देणं त्यांना सहज शक्य होत. पण मोरारजींचा मानी स्वभाव पवार साहेब जाणून होते. ते ऐकणार नाहीत हे पवार साहेब जाणून होते.

तरी पुढाकार घेऊन पवार साहेब त्यांना स्वतः भेटायला गेले.बोलता बोलता त्यांनी हा विषय देसाई यांच्यासमोर काढला.आणि मोरारजी यांनी पवार साहेबांना सुरवातीला सरळ फटकारल.ते म्हणाले, “मुंबईमध्ये लोकांना जागेची एवढी अडचण असताना, तुम्ही देऊ केलेलं घर मी कसं स्वीकारणार..?”मात्र साहेबांनी हार मानली नाही.त्यांनी नेटाने आपली बाजू लावून धरली. आणि शेवटी अनिच्छेने का होईना,पण देसाई ते घर घेण्यास तयार झाले. परंतु,”आपल्या हयातीनंतर राज्यसरकार ते घर वापस घेईल”, या अटीवरच..!

- Advertisement -

पवार साहेबांनी देखील ती अट मान्य केली. पुढे मोरारजी त्या घरात राहिले. स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेल्या एका स्वातंत्र्यसैनिकांची,पुढे देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होऊन देखील आयुष्यात साधेपणा जपनाऱ्या तत्वप्रेमी मोरारजी देसाई यांच्या प्रति साहेबांनी दाखवलेली तळमळ, त्यांची घेतलेली काळजी, या गोष्टी साहेबांच्या एकूणच व्यक्तिमत्वाची उंची स्पष्ट करतात..!

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -