घरपालघरत्या प्रिस्क्रीप्शनवरील हस्ताक्षराची तपासणी करा

त्या प्रिस्क्रीप्शनवरील हस्ताक्षराची तपासणी करा

Subscribe

वसई विरार महापालिकेच्या विजयनगर हॉस्पीटलमधील डॉक्टर प्रिस्क्रीप्शनवर विशिष्ठ कंपन्यांचीच औषध लिहून देत असल्याची तक्रार असून त्या प्रिस्क्रीप्शनमधील हस्ताक्षराची तज्ञांकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे अशोक शेळके यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

वसई : वसई विरार महापालिकेच्या विजयनगर हॉस्पीटलमधील डॉक्टर प्रिस्क्रीप्शनवर विशिष्ठ कंपन्यांचीच औषध लिहून देत असल्याची तक्रार असून त्या प्रिस्क्रीप्शनमधील हस्ताक्षराची तज्ञांकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे अशोक शेळके यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. वसई-विरार महापालिकेच्या विजयनगर येथील हॉस्पीटलमधील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज बाघेल (अस्थिरोग तज्ञ) हे रुग्णांना विशिष्ठ ब्रँडेड कंपनीची औषधे सुचवत असल्याची बाब सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. वास्तविक पाहता शासकीय वैद्यकीय अधिकार्‍याने कोणत्याही खाजगी कंपनीच्या विक्रेत्याला हॉस्पीटलमध्ये आपल्या सोबत आणू नये, रुग्णांना औषधे लिहून देताना विशिष्ठ ब्रँडेड कंपनीची औषधे लिहून देण्यात येऊ नयेत. त्याचप्रमाणे रुग्णांना स्वतःहून बाहेरील औषध पाहिजे असल्यास तसे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून लिहून घेणे कायद्याने बंधनकारक आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज बाघेल (अस्थिरोग तज्ञ) यांनी रुग्णाला दिलेली एक औषधाची पावती (प्रिस्क्रीप्शन) सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी रुग्णाला विशिष्ठ ब्रँडेड कंपनीची औषधे लिहून दिलेली आहेत. हे जरी खरे असले तरी शहरातील काही प्रसिद्ध डॉक्टरांनी याबद्दल आक्षेप घेतला असून हे हस्ताक्षर डॉ. सुरज बाघेल यांचे नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. जर कोणी व्यक्ती डॉ. सुरज बाघेल यांच्या हस्ताक्षराची नक्कल करुन हे कृत्य करीत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असून असे कृत्य म्हणजे सर्वसामान्य रुग्णांच्या जिविताशी खेळ करणारे आहे, अशी तक्रार शेळके यांनी केली आहे. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या प्रिस्क्रीप्शनमधील हस्ताक्षराची तपासणी पोलिसांमार्फत हस्ताक्षर तज्ञांकडून करण्यात यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या काही हॉस्पीटल्स, आरोग्य सुविधा केंद्रांमधील काही डॉक्टरांचे शहरातील लॅब, केमिस्ट आणि डॉक्टरांशी आर्थिक हितसंबंध आहेत. तर काही डॉक्टरांची शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये बेनामी भागीदारी असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यातूनच काही डॉक्टर रुग्णांना तपासण्या, औषधे विशिष्ठ ठिकाणांहूनच करण्याचा आग्रह धरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यातूनच खाजगी डॉक्टर कदाचित हितसंबंध असल्याने आरोप झालेल्या डॉक्टरांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असावेत, असा संशय व्यक्त करत शेळके यांनी प्रिस्क्रीप्शनमधील हस्ताक्षराची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -